Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 49:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 माझे मुख ज्ञान वदणार आहे; माझ्या मनचे विचार सुज्ञतेचे असणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 माझे मुख ज्ञान बोलेल, आणि माझ्या हृदयातील विचार समंजसपणाचे असणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 माझे मुख ज्ञानाचे शब्द बोलतात; माझ्या अंतःकरणाचे मनन सुज्ञतेचे असणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 49:3
15 Iomraidhean Croise  

माझ्या मनातले विचार जसेच्या तसे माझ्या शब्दांनी प्रकट होणार; माझ्या वाचेने प्रकट होणारे ज्ञान माझ्या तोंडून निष्कपटपणे निघणार.


नाहीतर माझे ऐक; उगा राहा, मी तुला ज्ञान सांगतो.”


मी केलेले त्याचे मनन त्याला गोड वाटो; परमेश्वराच्या ठायी मला हर्ष होईल.


तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते.


हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत.


नीतिमानाचे मुख सुज्ञान वदते, त्याची जीभ न्याय उच्चारते.


तरी हे ध्यानात ठेवा की, परमेश्वराने त्याच्या स्वतःसाठी भक्तिमान मनुष्य निवडून काढला आहे; मी परमेश्वराचा धावा करीन तेव्हा तो माझे ऐकेल.


माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे; राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवतो; माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे.


ज्ञान्यांची वचने कान लावून ऐक, माझ्या ज्ञानाकडे चित्त लाव,


चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो.


पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाची वृष्टी होवो, माझे भाषण दहिवराप्रमाणे ठिबको; कोवळ्या गवतावर जशी पावसाची झिमझिम, हिरवळीवर जशा पावसाच्या सरी, तसे ते वर्षो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan