Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 48:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 उत्तर सीमेवरील सीयोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 सियोन डोंगर, जो थोर राजाची नगरी आहे, पृथ्वीच्या बाजूस आहे, त्याचे सौंदर्य उच्चतेवर, सर्व पृथ्वीवर आनंद आणते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्यांचे शिखर मनोहर आहेत, ज्यात संपूर्ण पृथ्वी आनंदित आहे, सीयोन पर्वत उत्तरेकडील झाफोन पर्वतासारखेच उंच आहे, जे राजाधिराजाची नगरी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 48:2
21 Iomraidhean Croise  

यरुशलेमेत वस्ती करणार्‍या परमेश्वराचा धन्यवाद सीयोनेतून होवो. परमेशाचे स्तवन करा!1


सौंदर्याचा केवळ कळस असा जो सीयोन डोंगर, त्यावरून देव प्रकाशला आहे.


शालेमात त्याचा मंडप आहे; व सीयोनेत त्याचे निवासस्थान आहे.


हे देवाच्या नगरी, तुझ्या वैभवाच्या कथा सांगतात; (सेला)


परमेश्वर आपला देव ह्याची थोरवी गा, आणि त्याच्या पवित्र डोंगराजवळ नमन करा; कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.


जो तू आपल्या मनात म्हणालास, ‘मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन;


शेवटच्या दिवसांत असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याच्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील.


तुला पीडा करणार्‍यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील; तुला परमेश्वराचे नगर, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील.


यरुशलेमेबरोबर आनंद करा, तिच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व तिच्यामुळे उल्लासा; तिच्यासाठी शोक करणारे तुम्ही सर्व तिच्याबरोबर अत्यंत हर्षित व्हा;


मी तुला पुत्राच्या योग्यतेस आणावे, तुला मनोरम भूमी द्यावी, राष्ट्रांतील श्रेष्ठ वैभवाचे वतन तुला द्यावे असे मला वाटले होते; तुम्ही मला, माझ्या बापा, असे म्हणाल, मला अनुसरायचे सोडून मागे फिरणार नाही असे मला वाटले होते.


येणारेजाणारे सर्व तुला पाहून टाळ्या वाजवतात; ते यरुशलेमकन्येकडे पाहून धुत्कारतात व डोके हलवून म्हणतात, “जिला सौंदर्याची खाण, सर्व पृथ्वीचे आनंदभुवन म्हणतात, ती हीच का नगरी?”


त्या दिवशी मी हात उचलून त्यांच्याबरोबर शपथ केली की, मी तुम्हांला मिसर देशातून काढून दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत अशा तुमच्यासाठी पाहिलेल्या देशात आणीन; तो देश सर्व देशांचा मुकुटमणी होय.


त्याच्यावर चढाई करणारा आपल्या इच्छेस येईल तसे करील व त्याच्यासमोर कोणी टिकाव धरणार नाही; तो आपल्या हाती प्रत्यक्ष नाश घेऊन त्या वैभवी देशात उभा राहील.


समुद्राच्या व शोभिवंत पवित्र पर्वतांच्या दरम्यान तो आपले दरबारी तंबू ठोकील; पण त्याचा अंत येईल, कोणी त्याला साहाय्य करणार नाही.”


त्यांतल्या एका शिंगातून एक लहान शिंग निघाले; त्याची दृष्टी दक्षिणेस, पूर्वेस व त्या वैभवी देशाकडे पराकाष्ठेची झाली.


आपल्या कळपात नर असून त्याचा नवस केल्यावर कोणी सदोष पशूचा यज्ञ करतो; असा फसवणारा शापित असो. मी थोर राजा आहे व राष्ट्रांत माझ्या नावाची भीती धरतात, असे परमेश्वर म्हणतो.


सर्व राष्ट्रे तुम्हांला धन्य म्हणतील; कारण तुमची भूमी मनोरम होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


‘पृथ्वीचीही’ वाहू नका, कारण ‘ती त्याचे पादासन आहे;’ यरुशलेमेचीही नका, कारण ती ‘थोर राजाची’ नगरी आहे.


पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत,


Lean sinn:

Sanasan


Sanasan