Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 48:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वर थोर आहे, आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र डोंगरावर, तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर, परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेह महान आहेत, आमच्या परमेश्वराच्या नगरामध्ये, त्यांच्या पवित्र पर्वतावर ते सर्वोच्च स्तुतीस पात्र आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 48:1
31 Iomraidhean Croise  

मग येशूवा, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या व पथह्या हे लेवी म्हणाले, “उभे राहा आणि आपला देव परमेश्वर ह्याचा येणेप्रमाणे धन्यवाद अनंतकाळ करा : तुझे वैभवशाली नाम धन्य असो; ते सर्व धन्यवाद व स्तवन ह्यांपलीकडे आहे.


परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; त्याची थोरवी अगम्य आहे.


आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे; त्याची बुद्धी अमर्याद आहे.


तो म्हणेल, “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.”


हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहेस; तू माझ्या वैर्‍यांना माझ्यामुळे हर्ष करू दिला नाहीस.


हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे.


देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.


जिचे प्रवाह देवाच्या नगरीला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात अशी एक नदी आहे.


देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे; देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे.


हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो. तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते.


तर यहूदाचा वंश त्याने पसंत केला; आपणाला प्रिय जो सीयोन डोंगर तो त्याने पसंत केला.


कारण तू थोर व अद्भुत कृत्ये करणारा आहेस; तूच केवळ देव आहेस.


परमेश्वराचे अधिष्ठान पवित्र पर्वतांवर आहे.


हे देवाच्या नगरी, तुझ्या वैभवाच्या कथा सांगतात; (सेला)


कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व देवांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे.


परमेश्वर आपला देव ह्याची थोरवी गा, आणि त्याच्या पवित्र डोंगराजवळ नमन करा; कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.


त्या दिवशी असे होईल की एक मोठा कर्णा वाजेल; तेव्हा अश्शूर देशात गडप झालेले व मिसर देशात परागंदा झालेले लोक येतील आणि यरुशलेमेतील पवित्र डोंगरावर परमेश्वराला दंडवत घालतील.


सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो की, “मी यहूदा देशाचा व त्यातील नगरांचा बंदिवास उलटवीन तेव्हा ह्या देशात लोक पुन्हा हे आशीर्वचन म्हणतील : हे नीति-मत्तेच्या निवासा, पावित्र्याच्या गिरी, परमेश्वर तुझे कल्याण करो!


पण निभावलेले सीयोन डोंगरावर राहतील; तो पवित्रस्थान असा होईल; याकोबाचे घराणे आपल्या वतनाचा ताबा घेईल.


शेवटल्या दिवसांत असे होईल की, परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगरांहून तो उंच होऊन त्याकडे राष्ट्रे लोटतील.


परमेश्वर असे म्हणतो, मी सीयोनेस परत आलो आहे, मी यरुशलेमेत वस्ती करणार; यरुशलेमेस ‘सत्यनगर’ म्हणतील व सेनाधीश परमेश्वराच्या पर्वतास ‘पवित्र गिरी’ म्हणतील.


दानिएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात’ उभा असलेला तुम्ही पाहाल, (वाचकाने हे ध्यानात आणावे),


पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत,


इतक्यात ‘राजासनापासून’ वाणी झाली; ती म्हणाली, “अहो आमच्या देवाची ‘भीती बाळगणार्‍या सर्व लहानथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.”’


तेव्हा मी ‘पवित्र नगरी, नवी यरुशलेम’, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवर्‍यासाठी ‘शृंगारलेल्या नवरीप्रमाणे’ सजवलेली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan