Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 47:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे; तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कारण परात्पर परमेश्वर भय धरण्यास योग्य आहे; तो सर्व पृथ्वीवर थोर राजा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 कारण सर्वोच्च याहवेह भयप्रद आहेत; ते अखिल पृथ्वीचे सार्वभौम राजा आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 47:2
18 Iomraidhean Croise  

“हे स्वर्गीच्या देवा, परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे ह्यांच्यासंबंधाने तू आपला करार पाळतोस व त्यांच्यावर करुणा करतोस;


तुझ्या भयावह कृत्यांचा पराक्रम लोक विदित करतील; मी तुझी थोरवी वर्णन करीन.


कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा.


हे आमच्या तारणार्‍या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रांवर असलेल्यांचा आधार तू आहेस; तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हांला उत्तर देतोस.


तुझ्या पवित्रस्थानातून कार्य करणारा देव भयप्रद आहे, इस्राएलाचा देव आपल्या लोकांना बल व सामर्थ्य देतो. देव धन्यवादित असो.


अधिपतींची हिंमत तो नष्ट करतो; पृथ्वीवरील राजांना तो भयप्रद आहे.


कारण परमेश्वर थोर देव आहे; सर्व देवांहून तो थोर राजा आहे.


ते तुझे थोर व भययोग्य नाव स्तवोत; पवित्र तोच आहे.


आपल्या कळपात नर असून त्याचा नवस केल्यावर कोणी सदोष पशूचा यज्ञ करतो; असा फसवणारा शापित असो. मी थोर राजा आहे व राष्ट्रांत माझ्या नावाची भीती धरतात, असे परमेश्वर म्हणतो.


तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.


परमेश्वर तुझा देव ह्या प्रतापी व भययोग्य नावाचे भय बाळगण्यासाठी ह्या ग्रंथात जी नियमशास्त्राची वचने लिहिलेली आहेत ती तू काळजीपूर्वक पाळली नाहीस,


त्यांना पाहून घाबरू नकोस; कारण तुझा देव परमेश्वर तुझ्यामध्ये आहे; तो महान व भययोग्य देव आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan