Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 44:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 आम्ही तुझ्या साहाय्याने आपल्या शत्रूंना उलथून टाकू; आमच्यावर उठणार्‍यांना तुझ्या नावाने पायदळी तुडवू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे ढकलू. जे आमच्याविरूद्ध उठतात, तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूंना तुडवून टाकू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 कारण केवळ तुमच्याच शक्तीने व तुमच्याच नावाने, आम्ही आमचे शत्रू पायाखाली तुडवू शकलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 44:5
14 Iomraidhean Croise  

तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया ह्याने लोखंडाची शिंगे करून आणली होती; तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ह्या शिंगांनी तू अरामी लोकांना हुंदडून त्यांचा नाश करशील.”


देवाच्या साहाय्याने आम्ही पराक्रम करू; तोच आमच्या शत्रूंना तुडवून टाकील.


हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस; सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन, आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन.


देवाच्या साहाय्याने आम्ही पराक्रम करू, तोच आमच्या शत्रूंना तुडवून टाकील.


तू सिंह व नाग ह्यांच्यावर पाय देऊन चालशील; तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवत चालशील.


कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमचा नियंता आहे, परमेश्वर आमचा राजा आहे; तो आम्हांला तारील.


तो एडका पश्‍चिमेस, उत्तरेस व दक्षिणेस धडका मारीत आहे असे मी पाहिले; कोणी पशू त्याच्यासमोर उभा राहीना, व त्याच्या तडाक्यातून एखाद्यास सोडवायचे कोणास सामर्थ्य नव्हते; तो आपल्या मनास येई तसे करी, असा तो प्रबल झाला.


वाटेतला चिखल तुडवत युद्धाला निघालेल्या योद्ध्याप्रमाणे ते होतील; ते युद्ध करतील, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे; घोडेस्वार फजीत होतील.


शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो.


प्रथमजन्मलेल्या गोर्‍ह्यासारखा त्याचा प्रताप आहे; त्याची शिंगे रानबैलाच्या शिंगांप्रमाणे होत; त्यांनी तो सर्व राष्ट्रांना पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हुंदडील; असे एफ्राइमाचे लाखो व मनश्शेचे हजारो आहेत.


मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan