Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 44:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 हे देवा, तूच माझा राजा आहेस; याकोबाला जयावर जय प्राप्त होईल असे कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 देवा, तू माझा राजा आहेस, याकोबाला विजय मिळावा म्हणून आज्ञा दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तुम्ही माझे राजा आणि परमेश्वर आहात, जे याकोबाच्या विजयाचा आदेश देतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 44:4
14 Iomraidhean Croise  

त्याने आपल्या लोकांना राष्ट्रे वतनादाखल देऊन आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखवले आहे.


इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो; सीयोनेची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावोत.


तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रकट करील; मी रात्री त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन.


तरी देव पुरातन कालापासून माझा राजा आहे; पृथ्वीवर उद्धार करणारा तो आहे.


आमची ढाल परमेश्वराच्या मालकीची आहे; आमचा राजाही इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा आहे.


हे परमेश्वरा, तुझा उजवा हात बळाने प्रतापी झाला आहे; हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकतो.


कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमचा नियंता आहे, परमेश्वर आमचा राजा आहे; तो आम्हांला तारील.


तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले व लगेचच तिचा ताप निघाला, आणि ती त्यांची सेवा करू लागली.


तेव्हा येशूला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.”


तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्याबहिर्‍या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातून नीघ व पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नकोस.”


तू प्रत्यक्ष पाहिलेली संकटे, चिन्हे व चमत्कार, तसेच पराक्रमी बाहू व उगारलेला हात ह्यांच्या योगे तुझा देव परमेश्वर ह्याने तुला काढून आणले हेही चांगले आठव. ज्या राष्ट्रांची तुला भीती वाटत आहे त्या सर्वांचे तुझा देव परमेश्वर तसेच करील.


पण परमेश्वराने तुम्हांला पराक्रमी हाताने दास्यगृहातून मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या हातातून सोडवून बाहेर आणले, ह्याचे कारण हेच की, तुमच्यावर त्याचे प्रेम आहे, आणि तुमच्या पूर्वजांना त्याने जे शपथपूर्वक वचन दिले होते ते पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे.


मी तुमच्या आघाडीस गांधीलमाशा पाठवल्या व त्यांनी अमोर्‍यांचे दोन राजे तुमच्यापुढून हाकून दिले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan