Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 43:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रकट कर; ती मला मार्ग दाखवोत; तुझ्या पवित्र डोंगरावर, तुझ्या निवासस्थानी मला पोहचवोत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तू आपला प्रकाश आणि सत्य पाठवून दे, ते मला चालवोत. तुझ्या पवित्र डोंगराकडे आणि मंडपाकडे ते मला मार्गदर्शन करोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुमचा प्रकाश आणि तुमचे सत्य मला लाभोत; तीच मला मार्ग दाखवोत; तुमच्या पवित्र पर्वतावरील, तुमच्या निवासमंडपात, तीच मला घेऊन जावोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 43:3
26 Iomraidhean Croise  

तू कालचा आलेला माणूस; मी वाट फुटेल तिकडे जाणार, तर आज तुला आमच्याबरोबर इकडेतिकडे दौडवत का फिरवावे? तर तू आपला परत जा, आणि आपल्या भाऊबंदांनाही परत ने; दया व सत्य ही तुझ्यासमागमे राहोत.”


राजा सादोकास म्हणाला, “देवाचा कोश नगरात परत घेऊन जा; परमेश्वराची कृपादृष्टी माझ्यावर झाली तर तो मला परत आणील आणि हा कोश व आपले मंदिर मला पुन्हा दाखवील;


लोकांनी देवाचा कोश आणून त्यासाठी दाविदाने तयार केलेल्या तंबूत तो नेऊन ठेवला व त्यांनी देवापुढे होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली.


आणखी त्याने सादोक याजक व त्याचे याजक भाऊबंद ह्यांची गिबोन येथल्या उच्च स्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर योजना केली;


मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी ही दोन्ही त्या वेळेस गिबोन येथल्या उच्च स्थानी होती.


तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.


तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव; कारण तू माझा देव आहेस; तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेवो.


तो म्हणेल, “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.”


मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो, आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो. (सेला)


कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे; तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो.


हे परमेश्वरा, तू माझ्याविषयीचा आपला कळवळा आवरून धरू नकोस; तुझे वात्सल्य व तुझे सत्य ही माझे नित्य रक्षण करोत.


लोकसमुदाय सण पाळीत असे तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले; आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्यांना मी कसा मिरवत नेई, हे आठवून माझ्या जिवाचे पाणी पाणी होते.


जिचे प्रवाह देवाच्या नगरीला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात अशी एक नदी आहे.


तो स्वर्गातून साहाय्य पाठवून मला तारील; कारण माझा पिच्छा पुरवणारा माझा उपहास करीत आहे; (सेला) देव आपली दया व सत्य पाठवून देईल.


माझा जीव सिंहांमध्ये पडला आहे; ज्यांचे दात केवळ भाले व बाण आहेत, ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवारच आहे, अशा जाज्वल्य मनुष्यांमध्येदेखील मी पडून राहीन.


तर यहूदाचा वंश त्याने पसंत केला; आपणाला प्रिय जो सीयोन डोंगर तो त्याने पसंत केला.


हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत!


नीतिमानांसाठी प्रकाश व जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे.


प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबाबरोबर सत्यतेने व अब्राहामाबरोबर वात्सल्याने वर्तशील.


अगे माझ्या वैरिणी, माझ्यामुळे आनंद करू नकोस; मी पडले, तरी पुन्हा उठेन; मी अंधारात बसले, तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल.


कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले.


त्याच्या ठायी जीवन होते, व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan