Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 43:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 कारण हे देवा, तू माझा बळकट दुर्ग आहेस; तू माझा का त्याग केलास? वैर्‍याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेषाने मी का फिरावे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कारण तू माझ्या सामर्थ्याचा देव आहेस; तू मला का दूर केले आहे? शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करत फिरू?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 कारण परमेश्वर तुम्हीच माझे बळकट दुर्ग आहात; तुम्ही माझा त्याग का केला? शत्रूंद्वारे होणार्‍या छळामुळे मी का दुःखी व्हावे?

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 43:2
17 Iomraidhean Croise  

हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्त्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर; परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यांत जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करील.


हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, तू लढाईच्या प्रसंगी माझे शिरस्त्राण आहेस.


परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे; त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेवला आणि मी साहाय्य पावलो; म्हणून माझे हृदय उल्लासते; मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन.


त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पसरलेल्या जाळ्यातून तू मला ओढून काढ, कारण तू माझा आश्रय आहेस.


“तुझा देव कोठे आहे?” असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करतात; ह्यामुळे माझ्या हाडांचा चुराडा होतो.


देव जो माझा खडक त्याला मी म्हणेन, “तू मला का विसरलास? वैर्‍याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेषाने मी का फिरावे?”


तरी आता तू आम्हांला टाकले आहेस, आम्हांला फजीत केले आहेस; आमच्या सैन्याबरोबर तू जात नाहीस.


उतारवयात माझा त्याग करू नकोस; माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नकोस.


“प्रभू सर्वकाळ आमचा त्याग करील काय? तो पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही काय?


मी तरुणपणापासून पीडा पावून मरणोन्मुख झालो आहे; तुझ्या भीतीने मी व्याकूळ झालो आहे.


कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही; तो आपले वतन सोडून देणार नाही.


परमेश (याह) माझे बल, माझा स्तोत्रविषय आहे, तो माझा उद्धारक झाला आहे; हाच माझा देव, स्तवनाने मी ह्याला सुशोभित करीन; हाच माझ्या पित्याचा देव मी ह्याचा महिमा गाईन.


तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.


माझ्याविषयी म्हणतील की केवळ परमेश्वराच्या ठायीच न्याय्यत्व व सामर्थ्य आहे; त्याला प्रत्येक जण शरण येईल; त्याच्यावर संतापलेले सर्व लज्जित होतील.


मी त्यांना परमेश्वराच्या ठायी बलवान करीन; ते त्याच्या नामाने येतील-जातील,” असे परमेश्वर म्हणतो.


शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा.


मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan