Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 43:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे देवा, माझा न्याय कर; भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ; कपटी व कुटिल मनुष्यापासून मला मुक्त कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे देवा, तू माझा न्याय कर, आणि भक्तिहीन राष्ट्राविरूद्ध तू माझी बाजू मांड,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 परमेश्वर, मला निर्दोष ठरवा आणि भक्तिहीन पिढीविरुद्ध माझ्या बाजूने निकाल द्या. या दुष्ट आणि कपटी लोकांपासून माझा बचाव करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 43:1
21 Iomraidhean Croise  

कोणी दाविदाला सांगितले की, “अहिथोफेल हाही बंडखोरांना सामील होऊन अबशालोमाबरोबर आहे.” हे ऐकून दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा, अहीथोफेलाची मसलत फोल कर.”


मग अबशालोम अहीथोफेलास म्हणाला, “आता आपण काय करावे ह्याविषयी सल्ला दे.”


लढाई देशभर चालली; त्या दिवशी तलवारीपेक्षा रानामुळेच पुष्कळ लोकांचा धुव्वा उडाला.


गर्विष्ठ माझ्यासाठी पाश व दोर्‍या छपवून मांडतात; ते रस्त्याच्या बाजूस जाळे पसरतात; ते माझ्यासाठी सापळे लावतात. (सेला)


हे परमेश्वरा, माझा न्याय कर, कारण मी सात्त्विकपणे वागलो आहे, आणि परमेश्वरावर भरवसा ठेवला आहे; मी घसरणार नाही.


हे परमेश्वरा, मला विरोध करणार्‍यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणार्‍यांशी लढ.


हे परमेश्वरा, माझ्या देवा, आपल्या नीतीने माझा न्यायनिवाडा कर; ते माझ्याविरुद्ध हर्ष न करोत.


असत्य भाषण करणार्‍याचा तू नाश करतोस; खुनी व कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो.


कारण परकीय1 लोक माझ्यावर उठले आहेत; दांडगे लोक माझा जीव घेऊ पाहतात; त्यांनी देवाकडे लक्ष लावले नाही.


तुझ्याभोवती लोकांचा समुदाय गोळा होवो. तू त्यांच्यावर उच्च स्थानी आरूढ हो.


परमेश्वर लोकांचा न्याय करतो; माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे व माझ्या ठायी असलेल्या सात्त्विकतेप्रमाणे, हे परमेश्वरा, माझा न्याय कर.


दुष्टाची दुष्टाई नष्ट होवो, नीतिमानाला तू खंबीर कर; न्यायी देव मने व अंतःकरणे पारखणारा आहे.


हे माझ्या देवा, दुर्जनाच्या हातातून मला मुक्त कर, अन्यायी व निर्दय ह्यांच्या तावडीतून मला मुक्त कर.


तर न्याय करणारा देव आहे; तो एकाला खाली पाडतो व दुसर्‍याला वर चढवतो.


कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल. आणि त्यांना नागवणार्‍यांचा जीव नागवील.


कारण त्यांचा कैवारी समर्थ आहे; तो त्यांचा कैवार घेऊन तुझ्याविरुद्ध होईल.


परमेश्वर माझा तंटा लढून माझा हक्क संपादन करील, तोपर्यंत मी त्याचा राग सहन करीन; कारण मी त्याच्याविरुद्ध पाप केले आहे; मला तो प्रकाशात नेईल, मी त्याचे न्यायीपण पाहीन.


कारण जरी माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही; माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे.


त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही; तर यथार्थ न्याय करणार्‍याकडे स्वतःला सोपवून दिले.


परमेश्वर न्यायाधीश आहे, तो माझ्या व तुमच्यामध्ये निवाडा करो; माझे प्रकरण लक्षात आणून तो माझा कैवार घेवो, व माझा न्याय करून मला आपल्या हातून सोडवो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan