Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 42:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 लोकसमुदाय सण पाळीत असे तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले; आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्यांना मी कसा मिरवत नेई, हे आठवून माझ्या जिवाचे पाणी पाणी होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 हर्षानादाने आणि स्तुती करत, सण साजरा करणाऱ्या पुष्कळांबरोबर, कसा मी त्या गर्दीला नेतृत्व करत देवाच्या घरात घेऊन जात असे, हे आठवून माझा जीव माझ्याठायी ओतला जात आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 या गोष्टींची आठवण करून माझा आत्मा तुटत आहे: कसे मी परमेश्वराच्या भवनाकडे जाणार्‍या विशाल गर्दीचे नेतृत्व करीत होतो. त्यावेळी उत्सवाच्या वातावरणात आनंद, जयघोष आणि आभार यांचा आवाज प्रतिध्वनित होत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 42:4
28 Iomraidhean Croise  

परमेश्वर आमचा बचाव करीलच करील, हे शहर अश्शूराच्या राजाच्या हाती जाणार नाही असे बोलून हिज्कीया तुम्हांला परमेश्वरावर भिस्त ठेवायला न लावो.’


पुढे मी येऊन तुमच्या देशासारखा देश, धान्याचा व द्राक्षारसाचा देश, अन्नाचा व द्राक्षाच्या मळ्यांचा देश, जैतून तेलाचा व मधाचा देश ह्यात तुम्हांला नेईन; म्हणजे तुम्ही जिवंत राहाल, मरणार नाही; परमेश्वर आमचा बचाव करील असे बोलून हिज्कीया तुमचे मन वळवू पाहील तेव्हा त्याचे ऐकू नका.


राजाने सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी लोकांना आपापल्या डेर्‍यांकडे जाण्यास निरोप दिला; परमेश्वराने दाविदावर, शलमोनावर व आपल्या इस्राएल प्रजेवर जी कृपा केली होती तिच्यामुळे ते आनंदित, हर्षितचित्त झाले होते.


“पूर्वीचे महिने मला प्राप्त होते, पूर्वीच्यासारखे माझे दिवस असते, तर किती बरे होते! त्या दिवसांत देव माझे रक्षण करीत असे.


त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा; त्याचे उपकारस्मरण करा; त्याच्या नावाचा धन्यवाद करा.


ह्याला कारण तुझा रोष, तुझा क्रोध; कारण तू मला वर उचलून फेकून दिले आहेस.


“ह्यांचा देव कोठे आहे;” असे राष्ट्रांनी का म्हणावे?


“आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ” असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.


माझे बंधू व माझे मित्र ह्यांच्यासाठी “तुझ्यामध्ये शांती वसो” अशी मी प्रार्थना करीन.


आम्ही एकमेकांशी गोडगोड गोष्टी बोलत असू, देवाच्या घरी मेळ्याबरोबर जात असू.


अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा; त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा; देव आमचा आश्रय आहे. (सेला)


“ह्यांचा देव कोठे आहे,” असे राष्ट्रांनी का म्हणावे? तुझ्या सेवकांचा रक्तपात झाला त्याबद्दल सूड उगवण्यात आला आहे, हे आमच्यादेखत राष्ट्रांना कळू दे.


तू आम्हांला आमच्या शेजार्‍यांच्या कलहास कारण करतोस; आणि आमचे वैरी आमचा यथेच्छ उपहास करतात.


सण पाळताना जसा रात्री गायनाचा नाद उठतो तसा तुमच्या गायनाचा नाद उठेल; परमेश्वराच्या पर्वताकडे, इस्राएलाच्या दुर्गाकडे बासरी वाजवत समारंभाने जाणार्‍याप्रमाणे तुमच्या मनास उल्लास प्राप्त होईल.


ऊठ, रात्रीच्या प्रहरारंभी विलाप कर; प्रभूसमोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत; तुझी बालके हरएक गल्लीच्या चवाठ्यावर भुकेने व्याकूळ झाली आहेत, त्यांच्या प्राणरक्षणासाठी त्याच्याकडे हात पसर.


सोने कसे निस्तेज झाले आहे! अति शुद्ध सोने कसे बदलले आहे! पवित्रस्थानाचे पाषाण हरएक रस्त्याच्या चवाठ्यावर विखरले आहेत.


ते प्रवेश करीत असता अधिपतीने त्यांच्यात मिसळून आत यावे; ते बाहेर जातानाही त्याने त्यांच्याबरोबर जावे.


देवडी व वेदी ह्यांच्यामध्ये याजक, परमेश्वराचे सेवक, रुदन करत म्हणोत, ‘हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर; आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस; होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्भर्त्सना करतील; ‘त्यांचा देव आता कोठे गेला’ असे राष्ट्रांनी का म्हणावे?”’


शुभसंदेश असणारा, शांती जाहीर करणारा असा जो, त्याचे पाय पर्वतावर पाहा! हे यहूदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड; कारण ह्यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणारजाणार नाही; त्याचा समूळ उच्छेद झाला आहे.


अब्राहाम म्हणाला, ‘मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस.


तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी, आणि तुझ्या गावातला लेवी, आणि तुमच्यामध्ये असलेला उपरा, अनाथ व विधवा ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर.


मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले; परमेश्वर मला प्रतिकूल झाला, सर्वसमर्थाने मला पिडले आहे तर मला नामी का म्हणता?


Lean sinn:

Sanasan


Sanasan