Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 42:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 “तुझा देव कोठे आहे?” असे ते मला सतत म्हणतात, म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जेव्हा माझे शत्रू नेहमी मला म्हणतात की, “तुझा देव कोठे आहे?” तेव्हा रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 रात्र आणि दिवस, माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. मला लोक सतत असे विचारीत आहेत. “कुठे आहे तुझा परमेश्वर?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 42:3
16 Iomraidhean Croise  

मला होत असलेला उपद्रव कदाचित परमेश्वर पाहील आणि ह्या शिव्याशापाऐवजी मला चांगला मोबदला देईल.”


मी भाकरीप्रमाणे राख खाल्ली आहे; व माझ्या पाण्यात माझी आसवे मिसळली आहेत.


“ह्यांचा देव कोठे आहे;” असे राष्ट्रांनी का म्हणावे?


मी आपले हात तुझ्यापुढे पसरतो; शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे. (सेला)


ते म्हणतात, “त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकला आहे; तो त्याला मुक्त करो; तो त्याला सोडवो, कारण तो त्याचा आवडता आहे.”


ह्याला देवाच्या ठायी तारण नाही, असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत. (सेला)3


“तुझा देव कोठे आहे?” असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करतात; ह्यामुळे माझ्या हाडांचा चुराडा होतो.


अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे.


“ह्यांचा देव कोठे आहे,” असे राष्ट्रांनी का म्हणावे? तुझ्या सेवकांचा रक्तपात झाला त्याबद्दल सूड उगवण्यात आला आहे, हे आमच्यादेखत राष्ट्रांना कळू दे.


हे प्रभू, आमच्या शेजार्‍यांनी केलेली तुझी निंदा उलट त्यांच्या पदरी सातपटीने घाल.


तू त्यांना अश्रुरूप अन्न खायला दिले आहे आणि त्यांना माप पुरे भरून आसवे प्यायला दिली आहेत.


हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करण्यास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधण्यास स्थळ मिळाले आहे.


वर्षातून तीनदा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर हजर व्हावे.


देवडी व वेदी ह्यांच्यामध्ये याजक, परमेश्वराचे सेवक, रुदन करत म्हणोत, ‘हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर; आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस; होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्भर्त्सना करतील; ‘त्यांचा देव आता कोठे गेला’ असे राष्ट्रांनी का म्हणावे?”’


जी मला म्हणाली होती की, “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?” ती माझी वैरीण ते पाहील व ती लज्जेने व्याप्त होईल; माझे डोळे तिला पाहतील, तिला रस्त्यांतल्या चिखलासारखे तुडवतील.


अग्नीमधून निघणारी जिवंत देवाची वाणी ऐकून आम्ही जसे जिवंत राहिलो, तसा प्राणिमात्रांपैकी दुसरा कोण जिवंत राहिला आहे?


Lean sinn:

Sanasan


Sanasan