स्तोत्रसंहिता 41:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्वर त्याला सांभाळील; तो रोगी असता तू त्याचे अंथरूण बदलतोस.1 Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तो अंथरुणावर दुखणाईत असता परमेश्वर त्यास आधार देईल. तू त्याचे आजाराचे अंथरुण आरोग्यामध्ये पालटशील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ते रोगशय्येवर असता याहवेह त्यांना सांभाळतात; ते आजारी असता त्यांना आरोग्य देऊन त्यांचे अंथरूण बदलतात. Faic an caibideil |
त्यांनी त्याला सांगितले, “एका मनुष्याने आम्हांला वाटेत गाठून सांगितले की, ‘ज्या राजाने तुम्हांला पाठवले आहे त्याच्याकडे परत जा आणि त्याला सांगा, परमेश्वर म्हणतो तू एक्रोन येथले दैवत बआल-जबूब ह्याला प्रश्न करायला माणसे पाठवली ती इस्राएलात कोणी देव नाही म्हणून की काय? तर ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठणार नाहीस, तू अवश्य मरशील.”’