Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 40:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्याने मला भयानक खाचेतून दलदलीच्या चिखलातून बाहेर काढले, आणि त्याने माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थीर केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 निसरड्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्यांनी मला बाहेर काढले; त्यांनी माझी पावले खडकावर ठेवली, आणि त्यांनी मला उभे राहण्यास भक्कम ठिकाण दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 40:2
24 Iomraidhean Croise  

मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टले, मला अधोलोकाच्या यातना झाल्या, मला उपद्रव व क्लेश झाले,


तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर, आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नकोस.


वैरी माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहे; त्याने माझे जीवन धुळीस मिळवले आहे; पुरातन काळी मृत झालेल्यांप्रमाणे मला त्याने अंधकाराच्या स्थळी राहण्यास लावले आहे.


माझी पावले तुझ्याच मार्गाला धरून आहेत, माझे पाय घसरले नाहीत.


तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहेस, माझे पाय घसरले नाहीत.


तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, पर्वताचे पाये डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता.


कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील; मला तो आपल्या डेर्‍याच्या गुप्त स्थळी ठेवील; तो मला खडकावर उचलून ठेवील.


परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो, आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे.


माझे मन व्याकूळ झाले असता दिगंतापासूनही मी तुझा धावा करतो; जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला ने.


मी खोल दलदलीत रुतलो आहे, तेथे उभे राहण्यास आधार नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, आणि लोंढा माझ्यावरून जात आहे.


तू मला अनेक भारी संकटे भोगायला लावलीस, तरी तू माझे पुनरुज्जीवन करशील, आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील.


कारण माझ्यावर तुझी दया फार आहे; अधोलोकाच्या तळापासून तू माझा जीव उद्धरला आहेस.


बंदिवानांना जसे अंधारकोठडीत कोंडतात, तसे त्यांना कोंडतील व कारागृहात ठेवतील; आणि बहुत दिवसांनी त्यांची झडती घेतील.


तुझ्याविषयी म्हणशील तर तुझ्याबरोबर केलेल्या कराराच्या रक्तसिंचनामुळे मी तुझ्या बंदिवानांना निर्जल गर्तेतून मुक्त करीन.


आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.”


त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले; कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan