Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 39:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तर आता हे प्रभू, मी कशाची अपेक्षा करू? माझी आशा तुझ्याच ठायी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 हे प्रभू, आता मी कशाची वाट पाहू? तूच माझी एक आशा आहेस!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तर प्रभू, मी आता कोणत्या गोष्टींची प्रतीक्षा करू? माझी सर्व आशा तुमच्या ठायी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 39:7
12 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, मी तुझ्याकडून उद्धार होण्याची प्रतीक्षा करत आहे.


तो मला ठार मारणार; तरी मी त्याची आस धरीन;1 तरी माझ्या वर्तनक्रमाचे त्याच्यासमोर मी समर्थन करीन.


तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो; तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, राहत नाही.


हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी प्रतीक्षा करीत आहे; तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत.


तू सिद्ध केलेल्या तारणाची उत्कंठा धरून माझा जीव व्याकूळ झाला आहे, पण मी तुझ्या वचनाची आशा धरतो.


हे परमेश्वरा, मी तुझी आशा धरली आहे; हे प्रभू, माझ्या देवा, तू माझे ऐकशील.


त्यांनी आपल्या जमिनीस आपली नावे दिली; तरी त्यांच्या कबरांच त्यांची कायमची घरे आणि त्यांची पिढ्यानपिढ्यांची वसतिस्थाने होतील.


कोणी सुज्ञता, ज्ञान व चतुराई ह्यांनी परिश्रम करून काही संपादावे, आणि त्यासाठी ज्याने परिश्रम केले नाहीत त्याच्या वाट्यास ते ठेवून सोडून जावे; हेही व्यर्थ व मोठे अनिष्ट होय.


कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणी नाही; त्याला पुत्र किंवा बंधू नाही; तरी त्याच्या कष्टाला अंत नाही, व धनाने त्याच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. तो म्हणतो, “मी हे श्रम करतो व माझ्या जिवाचे सुख दवडतो, हे कोणासाठी?” हेही व्यर्थ, कष्टमय होय.


तेव्हा पाहा, शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य यरुशलेमेत होता; तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता.


आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हांला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan