Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 39:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 पाहा, तू माझे दिवस वीतभर केले आहेत; माझ्या आयुष्याचा काळ तुझ्यापुढे काही नाही; एखादा मनुष्य कितीही खंबीर असला तरी तो श्वासरूपच होय, हे खास. (सेला)

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पाहा, तू माझे दिवस हाताच्या रुंदी इतके केले आहेत. आणि माझा जीवनकाल तुझ्यासमोर काहीच नाही. खचित मनुष्य केवळ एक श्वासच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 पाहा, तुम्ही माझे दिवस चार बोटे केले आहे; माझा जीवितकाल तुमच्या दृष्टीने केवळ एका क्षणाचाच आहे; प्रत्येकजण, अगदी निश्चिंत असणारे लोकसुद्धा केवळ एक श्वास आहेत. सेला

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 39:5
17 Iomraidhean Croise  

याकोब फारोला म्हणाला, “माझी जीवितयात्रा एकशे तीस वर्षांची झाली आहे; माझ्या आयुष्याचे दिवस अल्प असून दु:खाचे गेले, आणि ते माझ्या वाडवडिलांच्या जीवितयात्रेच्या आयुष्यमर्यादेस जाऊन पोचले नाहीत.”


बर्जिल्लय राजाला म्हणाला, “माझ्या आयुष्याचे आता किती दिवस उरले आहेत की मी महाराजांबरोबर यरुशलेमेस जावे?


माझे दिवस साळ्याच्या धोट्यापेक्षा त्वरित जातात; ते निराशेने निघून जातात.


मनुष्य श्वासवत आहे; त्याचे आयुष्य नश्वर छायेसारखे आहे.


तू मनुष्याला अनीतीबद्दल धमकावून शासन करतोस, तेव्हा तू त्याचे सौंदर्य पतंगाप्रमाणे विलयास नेतोस; खरोखर सर्व माणसे श्वासवत आहेत. (सेला)


मानवप्राणी केवळ वाफ आहेत; ते केवळ मिथ्या आहेत; तराजूत घातले असता ते हलके भरतील; ते सर्व वाफच आहेत.


माझे आयुष्य किती अल्प आहे ह्याची आठवण कर; तू सर्व मानवजात निर्माण केलीस ती व्यर्थच काय?


ह्यासाठी आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की, आम्हांला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.


व्यर्थ हो व्यर्थ! असे उपदेशक म्हणतो; व्यर्थ हो व्यर्थ! सर्वकाही व्यर्थ.


मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम ह्यांचे निरीक्षण केले; तर पाहा, सर्वकाही व्यर्थ व वायफळ उद्योग होता; भूतलावर हित असे कशातच नाही.


सर्व राष्ट्रे त्याच्यापुढे काहीच नाहीत; त्याच्या हिशोबी ती अभाव व शून्यता ह्यांहूनही कमी आहेत.


त्या तुम्हांला उद्याचे समजत नाही; तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते.


तरी प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि ‘हजार वर्षे’ एका ‘दिवसासारखी’ आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan