Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 38:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तुझ्या कोपामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिले नाही; माझ्या पापामुळे माझ्या अस्थींत स्वस्थता नाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 माझे सर्व शरीर तुझ्या क्रोधाने आजारी झाले आहे. आणि माझ्या अपराधांमुळे माझ्या हाडांत स्वस्थता नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुमच्या संतापामुळे माझे शरीर रोगजर्जर झाले आहे; माझ्या पातकांमुळे माझ्या हाडांमध्ये स्वस्थता नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 38:3
13 Iomraidhean Croise  

तेव्हा उज्जीयाला क्रोध आला, धूप जाळण्यासाठी त्याने हातात धुपाटणे घेतले होते; आणि तो याजकांवर संतापला असता, त्यांच्यादेखत परमेश्वराच्या मंदिरात धूपवेदीजवळ त्याच्या कपाळावर कोड उठले.


सर्वसमर्थाचे तीर माझ्या देहात शिरले आहेत, त्यांचे विष माझा जीव शोषून घेत आहे; ईश्वराकडून आलेली संकटे माझ्याविरुद्ध सज्ज झाली आहेत.


माझे दिवस धुराप्रमाणे विरून जातात, माझी हाडे चुलीतल्या निखार्‍यासारखी गळून गेली आहेत.


मोठ्याने कण्हून कण्हून माझी चामडी माझ्या हाडांना चिकटून गेली आहे;


कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता; उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे. (सेला)


आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे; म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्लासतील.


हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे म्हणून माझ्यावर दया कर; माझी हाडे ठणकत आहेत, हे परमेश्वरा, मला बरे कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan