Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 34:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला; त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मी परमेश्वराकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने मला उत्तर दिले. आणि त्याने मला माझ्या सर्व भयांवर विजय दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कारण मी याहवेहचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले; त्यांनी मला माझ्या सर्व भयांपासून सोडविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 34:4
20 Iomraidhean Croise  

तो आसाच्या भेटीस जाऊन त्याला म्हणाला, “हे आसा, अहो यहूदी व बन्यामिनी लोकहो, मी म्हणतो ते ऐका; तुम्ही परमेश्वराच्याबरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील; तुम्ही त्याला शरण जाल तर तो तुम्हांला पावेल. पण तुम्ही त्याला सोडाल तर तो तुम्हांला सोडील.


मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली; त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली.


कारण त्याने पीडिताची दैन्यावस्था तुच्छ लेखली नाही व तिचा वीट मानला नाही. त्याने आपले मुख त्याच्या दृष्टिआड केले नाही; तर पीडिताने धावा केला तेव्हा त्याने तो ऐकला.


मी तर अधीर होऊन म्हणालो, “मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे;” तरी मी तुझा धावा केला तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकलास.


माझ्या न्याय्य पक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पावोत; आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणार्‍या परमेश्वराचा गौरव होवो, असे ते सतत म्हणोत.


मी तर दीन व दरिद्री आहे; तरी प्रभूला माझी चिंता आहे; माझा साहाय्यकारी व माझा मुक्तिदाता तू आहेस; हे माझ्या देवा, विलंब लावू नकोस.


म्हणून पृथ्वी उलथीपालथी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले,


मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकीन.


पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरतो, भीत नाही; कारण प्रभू परमेश्वर1 माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे.”


तो म्हणाला, “मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले; अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकलास.


मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.


मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.


कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.


आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली;


दावीद आपल्या मनात म्हणाला, “मी कोणत्या तरी दिवशी शौलाच्या हातून मरणारच तर पलिष्ट्यांच्या देशात पळून जावे ह्यापेक्षा दुसरा चांगला उपाय नाही; अशाने शौल माझ्यासंबंधाने निराश होऊन इस्राएल देशाच्या कोणत्याही प्रांतात माझा ह्यापुढे शोध करणार नाही; ह्याप्रमाणे मी त्याच्या हातून सुटून जाईन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan