Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 34:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील; दीन हे ऐकून हर्ष करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी परमेश्वराची स्तुती करणार, विनम्र ऐकतील आणि आनंद करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 याहवेहने माझ्यावर केलेल्या दयेची मी प्रतिष्ठा मिरवीन; हे ऐकून दीनजन हर्ष करोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 34:2
12 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जाणार आहे; परमेश्वराने दिले, आणि परमेश्वराने नेले; धन्य परमेश्वराचे नाम!”


त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित होवो.


तुझे भय धरणारे मला पाहून हर्ष करतील; कारण मी तुझ्या वचनाची आशा धरली आहे.


मी तुझ्या नावाचे उपकारस्मरण करावे म्हणून तू माझा जीव बंदीतून काढ; तू मला औदार्य दाखवतोस, म्हणून नीतिमान माझ्याभोवती जमतील.


आम्ही सतत देवाची प्रतिष्ठा मिरवतो, आणि तुझ्या नावाचे सर्वकाळ उपकारस्मरण करतो. (सेला)


इस्राएलाचा वंश परमेश्वराच्या ठायी नीतिमान ठरेल व त्याचा अभिमान बाळगतील.”


बाळगायचा असला तर, मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेमदया, न्याय आणि नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे, ह्याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, ह्याविषयी बाळगावा; ह्यात मला संतोष आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


ह्यासाठी की, “जो अभिमान बाळगतो, त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे.


“जो प्रतिष्ठा मिरवतो, त्याने ती प्रभूविषयी मिरवावी.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan