Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 33:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 वीणेवर परमेश्वराचे उपकारस्मरण करा; दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 वीणा वाजवून परमेश्वरास धन्यवाद द्या; दहा तारांच्या वाद्यावर त्याचे गुणगान गा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 वीणेवर याहवेहस धन्यवाद द्या; दशतंतू वाद्यावर त्यांचे संगीत गा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 33:2
16 Iomraidhean Croise  

दावीद व इस्राएल घराण्याचे सर्व लोक देवदारूच्या लाकडाची नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरू व झांजा परमेश्वरापुढे वाजवीत चालले.


दाविदाने लेव्यांच्या प्रमुखांना आज्ञा केली की सतार, वीणा व झांजा अशी वाद्ये वाजवून आनंदाने उच्च स्वराने गायन करतील असे तुमच्या भाऊबंदांतले गायक नेमा.


ह्या प्रकारे सगळ्या इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश जयजयकार करीत, रणशिंग, कर्णे व झांजा वाजवीत आणि सतारी व वीणा ह्यांचा नाद काढत समारंभाने वर आणला.


यदूथूनाचे वंशज : यदूथूनाचे पुत्र गदल्या, सरी, यशाया, हशब्या व मत्तिथ्या असे सहा;1 त्यांचा बाप यदूथून वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण व स्तवन करून संदेश देत असे, ते त्याच्या हाताखाली असत.


हे सर्व परमेश्वराच्या मंदिरात आपापल्या बापाच्या हाताखाली राहून देवाच्या मंदिराच्या सेवेत झांजा, सारंगी व वीणा वाजवून गात असत; आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या आज्ञेत असत.


हे देवा, मी तुला नवे गीत गाईन; दशतंतू वीणेवर मी तुझे स्तोत्र गाईन;


ती नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करोत. डफ व वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत.


मी तर सतारीवर तुझे स्तुतिस्तोत्र गाईन, हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन; हे इस्राएलाच्या पवित्र प्रभू, मी वीणेवर तुझी स्तोत्रे गाईन.


दशतंतुवाद्य, सतार व वीणा ह्यांच्या साथीने, गंभीर स्वराने गाणे चांगले आहे.


कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहेस; तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जयजयकार करतो.


मग अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्ट्री हिने हाती डफ घेतला आणि सर्व स्त्रिया डफ घेऊन तिच्यामागून नाचत चालल्या.


आणि ‘अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी’ व प्रचंड मेघगर्जनेच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली आणि जी वाणी मी ऐकली ती, जसे काय वीणा वाजवणारे आपल्या वीणा वाजवत आहेत, अशी होती.


त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते चार प्राणी व चोवीस वडील कोकर्‍याच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व ‘धूपाने’ भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या; त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या ‘प्रार्थना’ होत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan