Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 32:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील; मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढशील. (सेला)

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस. तू मला संकटांपासून वाचवशील, विजयाच्या गीताने तू मला वेढशील. (सेला)

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 माझे आश्रयस्थान तुम्ही आहात; संकटात तुम्हीच माझे रक्षण करणार आणि मुक्ततेच्या गीतांनी तुम्ही मला वेढणार. सेलाह

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 32:7
18 Iomraidhean Croise  

परमेश्वराने दाविदाला त्याच्या सर्व शत्रूंपासून व शौलाच्या हातांतून सोडवले त्या समयी त्याने परमेश्वराला हे कवन गाईले.


तू माझा आश्रय व माझी ढाल आहेस; मी तुझ्या वचनाची आशा धरतो.


हे परमेश्वरा, माझ्या वैर्‍यांपासून मला मुक्त कर; मी तुझ्या पाठीशी येऊन लपलो आहे.


अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले.


कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील; मला तो आपल्या डेर्‍याच्या गुप्त स्थळी ठेवील; तो मला खडकावर उचलून ठेवील.


तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी मनुष्यांच्या कारस्थानांपासून त्यांना लपवतोस; शब्दकलहापासून त्यांना आपल्या मंडपात सुरक्षित ठेवतोस.


दुर्जनाला पुष्कळ दु:खे भोगावी लागतात; परमेश्वरावर भाव ठेवणार्‍यांभोवती वात्सल्याचे वेष्टन असते.


त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले; हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील.


कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस; हे परमेश्वरा, तू त्याच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालतोस.


परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे; तो संकटसमयी उच्च दुर्ग आहे;


जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.


परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वत:साठी विजय साधला आहे.


तेव्हा राजाने राजपुत्र यमेल, अरहज्रीएलपुत्र सराया, व अब्देलपुत्र शलेम्या ह्यांना अशी आज्ञा केली की बारूख लेखक व यिर्मया संदेष्टा ह्यांना धरून आणावे; पण परमेश्वराने त्यांना लपवले.


कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे.


ते उच्च स्वराने म्हणत होते : “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकर्‍याकडून, तारण आहे!”


त्या दिवशी दबोरा आणि अबीनवामाचा मुलगा बाराक ह्यांनी गाइलेले गीत हे :


Lean sinn:

Sanasan


Sanasan