Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 32:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ह्यासाठी तू पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी; जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 याच कारणास्तव प्रत्येक देवभक्त तू पावशील तेव्हा तुझी प्रार्थना करो. संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 यासाठी प्रत्येक विश्वासणाऱ्याने तुम्हाला पावण्याची संधी आहे तोपर्यंत तुमची प्रार्थना करावी; संकटे जलाच्या महापूरासारखी आली तरी त्यांना त्याचा स्पर्श होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 32:6
24 Iomraidhean Croise  

वरून आपले हात लांब कर; व महापुरांतून, परक्यांच्या हातातून, मला सोडवून मुक्त कर.


तरी हे ध्यानात ठेवा की, परमेश्वराने त्याच्या स्वतःसाठी भक्तिमान मनुष्य निवडून काढला आहे; मी परमेश्वराचा धावा करीन तेव्हा तो माझे ऐकेल.


त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले; हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील.


तुझ्या धबधब्यांच्या आवाजाने जणू काय लोंढा लोंढ्याला बोलावत आहे; तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले आहेत.


तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही;


तेव्हा ते मला हाक मारतील; पण मी उत्तर देणार नाही; ते मला आसक्तीने शोधतील, पण मी त्यांना सापडणार नाही;


तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही.


परमेश्वर म्हणतो, “प्रसादसमयी मी तुझे ऐकले, उद्धारदिनी मी तुला साहाय्य केले; देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनांची पुन्हा वाटणी व्हावी म्हणून मी तुझे रक्षण करतो व लोकांच्या कराराप्रीत्यर्थ तुला नेमतो.


परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा;


तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हांला सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही.”


तो आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हांला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.


(कारण तो म्हणतो : “अनुकूल समयी मी तुझे ऐकले, व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले.” पाहा, आताच ‘समय अनुकूल आहे;’ पाहा, आताच ‘तारणाचा दिवस’ आहे.)


तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली.


धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan