Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 32:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठायी आनंदोत्सव करा; अहो सरळ मनाचे जनहो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 अहो न्यायी जनहो, परमेश्वराच्या ठायी आनंद व हर्ष करा. अहो सरळ जनहो हर्षाने तुम्ही जल्लोष करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 नीतिमान लोकांनो, याहवेहमध्ये आनंद आणि हर्ष करा; तुम्ही जे सरळ मनाचे आहात, ते आनंदाने आरोळ्या मारा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 32:11
18 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, जे चांगले व सरळ मनाचे आहेत, त्यांचे कल्याण कर.


ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य!


अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जयजयकार करा; सरळ माणसांना स्तुतिगान शोभते.


परंतु तुझा आश्रय करणारे सारे हर्ष करोत; त्यांचे तू रक्षण करतोस म्हणून ते सदा गजर करोत; ज्यांना तुझे नाव प्रिय आहे ते तुझ्या ठायी उल्लास पावोत.


परमेश्वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल व त्याचा आश्रय करील; सरळ अंतःकरणाचे सर्व जन उल्लास पावतील.


परंतु नीतिमान हर्ष करोत, देवापुढे आनंदोत्सव करोत, हर्षामुळे आनंद करोत.


सरळ मनाच्यांना तारणार्‍या देवाने माझी ढाल धरली आहे.


परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी उल्लास करो; द्वीपसमूह हर्ष करो!


अहो नीतिमान जनहो, परमेश्वराच्या ठायी हर्ष करा; त्याच्या पवित्र नावाचे कृतज्ञतापूर्वक स्तवन करा.


अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने, आनंदाने गा; त्याची स्तोत्रे गा.


हे महान पर्वता, तू काय आहेस? जरूब्बाबेलपुढे तू सपाट मैदान होशील; व तो ‘त्यावर अनुग्रह, त्यावर अनुग्रह,’ असा गजर करत कोनशिला पुढे आणील.”


इतकेच केवळ नाही, तर ज्याच्या द्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान बाळगतो.


तेथे तुम्ही आपले मुलगे व मुली, दास व दासी ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद करावा; तुमच्या वेशींच्या आत राहणार्‍या लेव्यासहित आनंद करावा, कारण तुमच्याबरोबर त्याला काही वाटा किंवा वतन नाही.


शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हांला लिहिण्यास मी कंटाळा करत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे.


कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरवसा न ठेवणारे, ते आपण सुंता झालेलेच आहोत.


प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा.


हन्ना हिने प्रार्थना केली ती ही : “परमेश्वराच्या ठायी माझे हृदय उल्लासत आहे; परमेश्वराच्या ठायी माझा उत्कर्ष झाला आहे; माझे मुख माझ्या शत्रूंविरुद्ध उघडले आहे. कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan