Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 30:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहेस; तू माझ्या वैर्‍यांना माझ्यामुळे हर्ष करू दिला नाहीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे परमेश्वरा, मी तुला उंच करीन, कारण तू मला उठून उभे केले आहेस आणि माझ्या शत्रूंना माझ्यावर हर्ष करू दिला नाहीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेह मी तुमची प्रशंसा करेन, कारण तुम्ही मला खोल दरीतून बाहेर काढले आहे आणि माझ्या शत्रूंना माझा उपहास करू दिला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 30:1
24 Iomraidhean Croise  

दावीद यरुशलेम येथे आपल्या मंदिरात आला आणि ज्या दहा उपपत्नी राजमंदिराच्या संरक्षणासाठी त्याने ठेवल्या होत्या त्यांना त्याने अटकेत ठेवून त्यांच्या उदरनिर्वाहाची तरतूद केली; पण त्याने त्यांच्याशी समागम केला नाही. त्या आमरण वैधव्यदशेत तशाच अटकेत राहिल्या.


दाविदाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधून होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली. ह्या प्रकारे देशासाठी विनवणी केली ती परमेश्वराने मान्य केली आणि इस्राएल लोकांचे त्या मरीपासून निवारण झाले.


सोरेचा राजा हीराम ह्याने दाविदाकडे जासूद पाठवले; तसेच त्याने गंधसरूचे लाकूड, सुतार व गवंडी पाठवले; त्यांनी दाविदासाठी राजमंदिर बांधले.


आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला. तेव्हा शौलाची कन्या मीखल दाविदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली, “एखादा हलकट मनुष्य उघडाबोडका होतो तसे आज इस्राएलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्राएलाचे महाराज किती वैभवशाली दिसले!”


तेव्हा राजा नाथान संदेष्ट्याला म्हणाला, “पाहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण देवाचा कोश कनाथीच्या आत राहत आहे!”


शलमोनाने शांत्यर्पणासाठी परमेश्वरापुढे अर्पण केलेले बळी बावीस हजार बैल आणि एक लाख वीस हजार मेंढरे होती. अशा रीतीने राजाने व सर्व इस्राएलांनी परमेश्वराच्या मंदिराचे प्रतिष्ठापन केले.


त्यांच्यात लेवी व बन्यामिनी ह्यांची टीप घेतली नाही; कारण ह्या राजाज्ञेचा यवाबाला वीट आला होता.


नाहीतर “मी ह्याला जिंकले” असे माझा वैरी म्हणेल; आणि मी ढळलो असता माझे शत्रू उल्लासतील.


हे परमेश्वरा, दुर्जनाच्या इच्छा पुरवू नकोस, त्याची दुष्ट योजना सिद्धीस जाऊ देऊ नकोस; नाहीतर तो उन्मत्त होईल. (सेला)


हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.


हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे; माझी फजिती होऊ देऊ नकोस; माझ्या वैर्‍यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस;


आता सभोवतालच्या माझ्या वैर्‍यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल; त्याच्या डेर्‍यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन. मी गायनवादन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन.


तू आपल्या लोकांना तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे; त्यांचा प्रतिपाळ कर, त्यांना सदोदित वाहून ने.


माझे वैरी माझ्याविषयी खोडसाळपणाने हर्ष न करोत; विनाकारण माझा द्वेष करणारे डोळे न मिचकावोत;


माझा वैरी माझ्याविरुद्ध जयोत्सव करीत नाही, ह्यावरून तू माझ्यावर प्रसन्न आहेस असे मी समजतो.


मी आपल्या मुखाने त्याचा धावा केला, माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते.


“ह्यांचा देव कोठे आहे,” असे राष्ट्रांनी का म्हणावे? तुझ्या सेवकांचा रक्तपात झाला त्याबद्दल सूड उगवण्यात आला आहे, हे आमच्यादेखत राष्ट्रांना कळू दे.


आम्ही आमच्या शेजार्‍यांना निंदास्पद आणि आमच्या सभोवतालच्या लोकांना तुच्छ व हास्यास्पद झालो आहोत.


येणारेजाणारे सर्व तुला पाहून टाळ्या वाजवतात; ते यरुशलेमकन्येकडे पाहून धुत्कारतात व डोके हलवून म्हणतात, “जिला सौंदर्याची खाण, सर्व पृथ्वीचे आनंदभुवन म्हणतात, ती हीच का नगरी?”


आता मी नबुखद्नेस्सर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करतो, त्याचा जयजयकार करतो व त्याचा महिमा वर्णन करतो; कारण त्याची सर्व कृत्ये सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्याय्य आहेत; जे अभिमानाने चालतात त्यांना त्याला नीचावस्थेत लोटता येते.


मग अंमलदारांनी लोकांना म्हणावे, ‘ज्याने नवे घर बांधून त्यात प्रवेश केला नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यास दुसरा कोणी गृहप्रवेश करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan