Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तारण परमेश्वराच्या हातून होते; तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. (सेला)

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तारण परमेश्वरापासूनच आहे, तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. सेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 कारण सुटका याहवेहपासूनच आहे. तुमच्या लोकांवर तुमचा आशीर्वाद असो. सेला

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 3:8
22 Iomraidhean Croise  

त्या शेताच्या मध्यभागी उभे राहून शम्माने शेताचे रक्षण केले व त्या पलिष्ट्यांचा वध केला; त्या प्रसंगी परमेश्वराने मोठा विजय घडवून आणला.


मी तुझा आहे, माझे तारण कर, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे.


परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य देईल; परमेश्वर आपल्या लोकांना शांतीचे वरदान देईल.


तू आपल्या सेवकावर आपला मुखप्रकाश पाड; तू आपल्या वात्सल्याने मला तार.


वाहणार्‍या लोंढ्याप्रमाणे ते वाहून जावोत; तो बाण रोखील तेव्हा ते भंग पावल्याप्रमाणे होवोत.


त्याचे नाव सर्वकाळ राहो; सूर्य आहे तोवर त्याचे नाव वृद्धिंगत होवो; त्याच्या नावाने लोक आपणांस धन्य म्हणोत; सर्व राष्ट्रे त्याचा धन्यवाद करोत.


हे परमेश्वरा, त्यांना दहशत घाल; आपण केवळ मर्त्य आहोत असे राष्ट्रांना कळू दे. (सेला)


लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करतात, पण यश देणे परमेश्वराकडे असते.


मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही.


टेकड्यांवरील शब्द, डोंगरांवरील गडबड खोटी ठरली आहे; खरोखर आमचा देव परमेश्वर ह्याच्या ठायी इस्राएलाचे तारण आहे.


मिसर देशापासून मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्यावाचून अन्य देव तुला ठाऊक नाही, माझ्यावाचून कोणी त्राता नाही.


पण मी तुला आभारप्रदर्शनाचे यज्ञ करीन; मी केलेले नवस फेडीन; तारण परमेश्वरापासून होते.”


कोश पुढे जाण्यास निघाला म्हणजे मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, ऊठ, तुझ्या शत्रूंची दाणादाण होवो आणि तुझे द्वेष्टे तुझ्यापुढून पळून जावोत.”


देवाने आपल्या ‘सेवकाला’ उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले, ह्यासाठी की, त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा.”


आणि तारण दुसर्‍या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.”


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे;


“मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन.”


वाइटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका; तर उलट आशीर्वाद द्या; कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे.


ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “‘हालेलूया!’ तारण, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही प्रभू जो आमचा देव ह्याची आहेत;


ते उच्च स्वराने म्हणत होते : “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकर्‍याकडून, तारण आहे!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan