Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 हे परमेश्वरा, ऊठ; माझ्या देवा, मला तार; तू माझ्या सर्व वैर्‍यांच्या तोंडात मारले आहेस; तू दुर्जनांचे दात पाडले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार! कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस, तू दुष्टांचे दात पाडले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 याहवेह, उठा! हे माझ्या परमेश्वरा, मला वाचवा! माझ्या सर्व शत्रूंच्या जबड्यांवर प्रहार करा; त्या दुष्टांचे दात पाडून टाका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 3:7
17 Iomraidhean Croise  

लढाई देशभर चालली; त्या दिवशी तलवारीपेक्षा रानामुळेच पुष्कळ लोकांचा धुव्वा उडाला.


लोक माझ्याकडे पाहून तोंडे विचकत आहेत; माझी निर्भर्त्सना करून ते माझ्या गालावर चापट्या मारत आहेत; ते एकत्र होऊन माझ्यावर चालून आले आहेत.


मी दुष्टांचे दात पाडी, त्याच्या दातांतून शिकार सोडवी.


हे परमेश्वरा, ऊठ; हे देवा, आपला हात उगार; दीनांना विसरू नकोस.


परमेश्वर म्हणतो, “दीनांवरील जुलमामुळे व कंगालांच्या उसाशामुळे मी आता उठलो आहे, ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे, त्यात मी त्याला सुरक्षित ठेवीन.”


सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही; माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिम्मत धरून राहीन.


हे माझ्या देवा, हे माझ्या प्रभू, माझा न्यायनिवाडा व माझ्यासाठी वाद करावा म्हणून ऊठ, जागृत हो.


हे प्रभू, जागा हो, का झोपलास? ऊठ, आमचा कायमचा त्याग करू नकोस.


हे देवा, त्यांचे दात त्यांच्याच घशात घाल; हे परमेश्वरा, तरुण सिंहांच्या दाढा पाडून टाक.


हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, इस्राएलाच्या देवा, तू सर्व राष्ट्रांची झडती घेण्यास जागृत हो; कोणाही दगेखोर दुष्टावर दया करू नकोस. (सेला)


हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ, माझा जीव वाचव, तू आपल्या वात्सल्यानुसार मला तार;


हे परमेश्वरा, तू क्रोधाविष्ट होऊन ऊठ; माझे शत्रू संतापले असता त्यांच्याविरुद्ध उभा राहा; माझ्यासाठी जागृत हो. तू न्यायाची योजना केलीच आहेस;


तू आपला हात, म्हणजे आपला उजवा हात, का आवरून धरतोस? तो आपल्या छातीवरून काढून तू त्याचा संहार कर.


पृथ्वीवरील सर्व दीनांस तारण्यासाठी, न्यायनिवाडा करण्यासाठी देव उठला, तेव्हा असे झाले. (सेला)


हे परमेश्वराच्या भुजा, जागृत हो, जागृत हो, बलयुक्त हो; पूर्वकाळच्या दिवसांतल्याप्रमाणे, प्राचीन युगातल्याप्रमाणे जागृत हो. राहाबास छिन्नभिन्न करणारा तूच नव्हेस काय? मगरास विंधणारा तूच नव्हेस काय?


मारत्या इसमाकडे त्याने आपला गाल करावा; त्याने उपहास सोसावा.


जो काष्ठास म्हणतो, ‘जागे हो’; मुक्या पाषाणास म्हणतो, ‘ऊठ!’ त्याला धिक्कार असो. त्याला काही शिकवता येईल काय? पाहा, ती मूर्ती सोन्यारुप्याने मढवली आहे, पण आत पाहावे तर जिवाचा पत्ता नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan