Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 28:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मनात कपट असून आपल्या शेजार्‍यांशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी ह्यांच्याबरोबर मला ओढून नेऊ नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जे अन्याय करतात त्या दुष्टांबरोबर मला फरफटू नकोस. जे त्यांच्या शेजाऱ्यांसोबत शांतीने बोलतात, परंतु त्यांच्या हृदयात मात्र वाईट असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 दुष्टांना दिलेल्या शिक्षेमध्ये मला ओढू नका, जे अन्याय करतात, शेजार्‍यांशी त्यांचे संभाषण अतिशय सलोख्याचे आहे, परंतु त्यांच्या हृदयात केवळ कपट असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 28:3
17 Iomraidhean Croise  

तू हे पाहिलेच आहे, उपद्रव व दुःख ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्यांच्याकडे तू नजर लावतोस; लाचार तुझ्यावर हवाला टाकतो; पोरक्यांचा साहाय्यकर्ता तू आहेस.


त्याच्या तोंडी शाप, कपट व जुलूम सदैव आहेत; त्याच्या जिभेवर उपद्रव व दुष्टाई आहेत.


ते एकमेकांशी असत्य भाषण करतात, ते दुटप्पीपणाने खुशामतीचे शब्द बोलतात,


अनीती करणार्‍या मनुष्यांबरोबर मी दुराचरण करू नये म्हणून माझे मन कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळू देऊ नकोस; आणि मला त्यांची मिष्टान्ने खाऊ देऊ नकोस.


पातक्यांबरोबर माझा जीव आणि पातकी मनुष्यांबरोबर माझा प्राण काढून नेऊ नकोस;


तो अंथरुणावर पडल्यापडल्या अनीतीच्या योजना करतो; तो कुमार्ग धरून राहतो, वाइटाचा वीट मानत नाही.


हे बलवान पुरुषा, दुष्कर्माची आढ्यता का मिरवतोस? देवाचे वात्सल्य अखंड आहे.


त्याच्या तोंडचे शब्द लोण्यासारखे मृदू होते, पण त्याचे हृदय युद्धप्रिय होते; त्याचे शब्द तेलापेक्षा बुळबुळीत पण नागव्या तलवारींसारखे होते.


त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडण्यासाठी मात्र ते मसलत करतात; त्यांना लबाडी आवडते; ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण मनातून शाप देतात. (सेला)


पाहा, तो मनुष्य दुष्कर्माच्या वेणा देतो; उपद्रवाची गर्भधारणा करतो व असत्याला प्रसवतो.


जे संदेष्टे माझ्या लोकांना बहकवतात, काही चावण्यास मिळाले तर ‘कल्याण असो,’ असे जे म्हणतात व ज्याच्यापासून त्यांना चावण्यास मिळत नाही त्याच्याबरोबर लढण्याची जे तयारी करतात, त्यांच्याविषयी परमेश्वर असे म्हणतो.


तो मंडळीला म्हणाला, “तुम्ही ह्या दुष्ट मनुष्यांच्या तंबूंपासून निघून जा. त्यांच्या कोणत्याही वस्तूला शिवू नका; नाहीतर त्यांच्या सर्व पापांचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावाल.”


मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.


‘ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan