Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 28:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो; माझ्या दुर्गा, माझे न ऐकलेसे करू नकोस; तू माझ्याशी मौन धरल्यास गर्तेत पडणार्‍यांसारखी माझी गती होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे परमेश्वरा, माझ्या खडका, मी तुलाच आरोळी करतो. मला दुर्लक्षित करू नको. जर तू मला उत्तर दिले नाहीस तर जे थडग्यात जातात त्यांसारखा मी होईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेह, मी तुम्हाला हाक मारत आहे; तुम्ही माझे आश्रयदुर्ग आहात. माझ्यासाठी आपले कान बंद करू नका; जर तुम्ही उत्तर दिले नाही, तर मी खड्ड्यात पडलेल्या लोकांसारखा होईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 28:1
21 Iomraidhean Croise  

त्याने माझा जीव राखला, मला गर्तेत पडू दिले नाही, माझ्या जिवाला प्रकाश लाभला आहे.’


मी आपल्या वाणीने परमेश्वराला आरोळी मारतो; आपल्या वाणीने परमेश्वराची विनवणी करतो.


मी त्याच्यापुढे आपले गार्‍हाणे मांडतो; मी आपले संकट त्याला सांगतो.


हे परमेश्वरा, त्वरा करून माझे ऐक; माझा आत्मा गळून गेला आहे; तू आपले तोंड माझ्यापासून लपवू नकोस; लपवशील तर मी गर्तेत उतरणार्‍यांसारखा होईन.


परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करतो; तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरूज आहे.


माझ्या देवा, दिवसा मी धावा करतो तरी तू ऐकत नाहीस; रात्रीही धावा करतो तरी मला चैन पडत नाही.


मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो, आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो. (सेला)


अहो परमेश्वराचे भक्तहो, त्याचे गुणगान गा; आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करताना त्याचा धन्यवाद करा.


“मी मृत्यू पावल्याने, मी गर्तेत पडल्याने काय लाभ? माती तुझी स्तुती करील काय? ती तुझे सत्य प्रकट करील काय?


हे परमेश्वरा, तूही पाहिले आहेस, उगा राहू नकोस; हे प्रभू, माझ्यापासून दूर राहू नकोस.


हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या धाव्याकडे कान लाव; माझे अश्रू पाहून उगा राहू नकोस; कारण मी आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यापुढे परदेशीय व उपरा आहे.


देव जो माझा खडक त्याला मी म्हणेन, “तू मला का विसरलास? वैर्‍याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेषाने मी का फिरावे?”


हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे; मी तुझी प्रार्थना करीत आहे.


पाण्याचा लोंढा माझ्यावरून जाऊ देऊ नकोस; दलदलीत मला खचू देऊ नकोस; गर्तेच्या जाभाडात मला गुंतून पडू देऊ नकोस.


मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन; त्याने माझे ऐकावे म्हणून मी देवाला हाक मारीन.


हे देवा, तू स्तब्ध राहू नकोस. हे देवा, मौन धरू नकोस, स्वस्थ राहू नकोस.


त्यांना जिवंतपणीच अधोलोकाप्रमाणे गट्ट करू, गर्तेत गडप होणार्‍यांप्रमाणे सात्त्विकांना गिळून टाकू.


परमेश्वरावर सर्वकाळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश हा सनातन आश्रयदुर्ग आहे.


अधोलोक तुझा धन्यवाद करीत नाही, मृत्यू तुझी स्तुती गात नाही; शवगर्तेत उतरलेले तुझ्या सत्याची अपेक्षा करीत नाहीत.


आणि ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे


Lean sinn:

Sanasan


Sanasan