Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 27:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव; लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 परमेश्वरा, तू मला तुझे मार्ग शिकव. माझ्या वैऱ्यामुळे, मला सपाट मार्गावर चालव.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 याहवेह, मला तुमचे मार्ग शिकवा; माझी छळणूक करणाऱ्यांमुळे मला सरळ मार्गावर घेऊन चला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 27:11
22 Iomraidhean Croise  

अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.


माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालव.


परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल.


तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो. तो दीनांना आपला मार्ग शिकवतो.


माझा पाय प्रशस्त स्थळी स्थिर आहे; जनसभांत मी परमेश्वराचा धन्यवाद करीन.


हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या नीतिमार्गाने ने, आपला मार्ग माझ्यापुढे नीट कर.


त्यांच्या तोंडाचा भरवसा नाही; त्यांचे अंतर्याम केवळ खाच आहे; त्यांचा घसा केवळ उघडे थडगे आहे; ते आपल्या जिभेने गोडगोड बोलतात.


माझ्यावर टपून बसणार्‍यांनी केलेल्या अपकाराचा मोबदला तो त्यांना देईल; तू आपल्या सत्याच्या प्रभावाने त्यांचा उच्छेद कर.


ते कुटिल युक्त्या शोधून काढतात; ते म्हणतात, “आपण चतुराईने युक्ती शोधून काढली आहे;” प्रत्येकाचे अंतर्याम व हृदय खोल आहे,


हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.


आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी असते, पण सरळांची वाट राजमार्ग बनते.


ज्याला समज आहे त्याला ती सर्व उघड आहेत; ती ज्ञान प्राप्त झालेल्यांना सरळ आहेत


तेथील मार्ग राजमार्ग होईल; त्याला पवित्र मार्ग म्हणतील; त्याने अपवित्र जन जाणार नाहीत; पण तो त्यांच्यासाठीच, परमेश्वराच्या लोकांसाठी होईल; त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी मार्ग चुकणार नाहीत.


कारण मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो; चोहोकडे दहशत आहे. मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की त्याच्याविरुद्ध गिल्ला करा, आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू; कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू.”


मग ते त्याच्या पाळतीवर राहिले आणि त्याला बोलण्यात धरून सुभेदाराच्या तावडीत व अधिकारात आणावे म्हणून त्यांनी नीतिमान असल्याची बतावणी केलेले हेर त्याच्याकडे पाठवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan