Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 26:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 पातक्यांबरोबर माझा जीव आणि पातकी मनुष्यांबरोबर माझा प्राण काढून नेऊ नकोस;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 पाप्यांसोबत किंवा रक्तपात करणाऱ्यांसोबत माझा प्राण काढून घेऊ नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 पातकी लोकांसोबत माझ्या जीवाला, आणि रक्तपिपासू लोकांसोबत माझे प्राण घेऊ नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 26:9
14 Iomraidhean Croise  

शिमी शिव्याशाप देऊन म्हणाला, “अरे खुनी माणसा, अधमा, नीघ, चालता हो;


दाविदाच्या कारकिर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला; तेव्हा दाविदाने परमेश्वरासमोर जाऊन प्रश्‍न केला. परमेश्वराने उत्तर दिले, “शौल व त्याचे खुनी घराणे ह्यांच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे, कारण त्याने गिबोनी लोकांचा संहार केला.”


हे देवा, तू दुर्जनांना ठार मारून टाक; अहो रक्तपात करणार्‍यांनो, माझ्यापासून दूर व्हा.


हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील.


हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील. खुनी व कपटी माणसे अर्धे आयुष्यही जगणार नाहीत; मी तर तुझ्यावर भाव ठेवीन.


मग तुम्ही वळाल, आणि नीतिमान व दुष्ट ह्यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा ह्यांच्यातला भेद तुम्हांला कळेल.


त्याला छाटून टाकील व ढोंग्यांना देण्याचा वाटा त्याच्या पदरी बांधील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.


त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील; आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील,


त्या वेळेस हेही त्याला उत्तर देतील, ‘प्रभूजी, आम्ही केव्हा तुम्हांला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही?’


‘ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील.”’


एक मनुष्य आपला पाठलाग करायला व आपला प्राण घ्यायला उठला आहे, तरी माझ्या स्वामींचा प्राण आपला देव परमेश्वर ह्याच्याजवळ जिवंताच्या समूहात बांधलेला राहील, आणि आपल्या शत्रूंचे प्राण तो जसे काय गोफणीत घालून गोफणून टाकील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan