Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 26:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 परमेश्वरा, तुझे राहण्याचे घर आणि तुझे गौरव जिथे असते, ते घर मला आवडते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 याहवेह, मला तुमचे निवासस्थान आवडते, इथेच तुमचे वैभव वसती करते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 26:8
22 Iomraidhean Croise  

राजा सादोकास म्हणाला, “देवाचा कोश नगरात परत घेऊन जा; परमेश्वराची कृपादृष्टी माझ्यावर झाली तर तो मला परत आणील आणि हा कोश व आपले मंदिर मला पुन्हा दाखवील;


ह्याशिवाय माझे चित्त माझ्या देवाच्या मंदिराकडे लागले आहे म्हणून पवित्र मंदिरासाठी जो मी संग्रह केला आहे त्याशिवाय आणखी माझा स्वतःचा सोन्यारुप्याचा निधी मी देवाच्या मंदिरासाठी देतो.


त्या मेघामुळे याजकांना सेवाचाकरी करण्यास उभे राहवेना, कारण परमेश्वराच्या तेजाने देवमंदिर भरून गेले.


शलमोनाने प्रार्थना करणे संपवल्यावर स्वर्गातून अग्नीने येऊन होमबली व यज्ञबली भस्म केले; आणि परमेश्वराच्या तेजाने ते मंदिर भरून गेले.


याजकांना परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने ते भरून गेले होते.


परमेश्वर आमचा देव ह्याच्या घरासाठी तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन.


लोकसमुदाय सण पाळीत असे तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले; आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्यांना मी कसा मिरवत नेई, हे आठवून माझ्या जिवाचे पाणी पाणी होते.


खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे2 मला इष्ट वाटते.


परमेश्वर मला तारण्यास सिद्ध आहे; म्हणून आम्ही आपली तंतुवाद्ये वाजवू; ती सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात वाजवू.”


हिज्कीयाने म्हटले होते, “मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन ह्याचे चिन्ह काय?”


तेव्हा आत्म्याने मला उचलून धरले आणि माझ्यामागून त्याच्या स्थानातून, परमेश्वराच्या वैभवाचा धन्यवाद असो, असा प्रचंड वेगाचा शब्द झालेला मी ऐकला.


मग असे झाले की, तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्‍न करताना सापडला.


तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध करत राहिलात हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan