Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 26:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे; तुझ्या सत्यमार्गाने मी चाललो आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण तुझी प्रेमदया सदैव माझ्या डोळ्यांपुढे आहे, आणि मी तुझ्या सत्यात चाललो आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 कारण मी नेहमीच तुमच्या अतुलनीय करुणेची आठवण ठेवतो आणि तुमच्या विश्वासूपणावर अवलंबून राहिलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 26:3
25 Iomraidhean Croise  

“हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्त्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करत आलो आहे ह्याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो.” असे म्हणून हिज्कीया मनस्वी रडला.


मी सुज्ञतेने, सरळ मार्गाने चालेन; तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन.


तुझे न्याय्यत्व हे सनातन न्याय्यत्व आहे, आणि तुझे नियमशास्त्र सत्य आहे.


तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस; मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो.


हे बलवान पुरुषा, दुष्कर्माची आढ्यता का मिरवतोस? देवाचे वात्सल्य अखंड आहे.


हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.


याकोबाच्या घराण्या, चल, ये, आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू.


नियमशास्त्र व साक्ष ह्यांकडे पाहा! ह्याप्रमाणे ते न बोलल्यास त्यांच्यासाठी निश्‍चये प्रभातसमय नाही.


जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.


येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.


परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत;2 आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे; तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.


आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.


पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.


आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्यामुळे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत, ह्यावरून मला अतिशय आनंद झाला.


प्रिय बंधो, वाइटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणार्‍याने देवाला पाहिलेले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan