Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 26:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्यांचे हात उपद्रवाने भरलेले आहेत, त्यांचा उजवा हात लाचलुचपतींनी भरलेला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्यांच्या हातात कट आहे, आणि त्यांचा उजवा हात लाच घेण्याने भरला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्यांच्या हातात दुष्ट योजना आहेत, त्यांचा उजवा हात लाचेने भरलेला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 26:10
17 Iomraidhean Croise  

तू हे पाहिलेच आहे, उपद्रव व दुःख ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्यांच्याकडे तू नजर लावतोस; लाचार तुझ्यावर हवाला टाकतो; पोरक्यांचा साहाय्यकर्ता तू आहेस.


कारण पाहा, दुर्जन धनुष्य वाकवत आहेत; सरळ मनाच्यांना अंधारात मारण्यासाठी दोरीला तीर लावत आहेत;


तो अंथरुणावर पडल्यापडल्या अनीतीच्या योजना करतो; तो कुमार्ग धरून राहतो, वाइटाचा वीट मानत नाही.


अरे कपट करणार्‍या, तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्‍यासारखी अनर्थाची योजना करते.


लाच घेऊ नकोस, कारण लाच डोळसांना आंधळे करते, आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपर्यास करते.


कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात, आणि रक्तपात करण्यास त्वरा करतात.


कारण दुष्कर्म केल्यावाचून त्यांना झोप येत नाही; कोणाला पाडले नाही, तर त्यांची झोप उडते.


जो धर्माने चालतो, सरळ भाषण करतो, जुलूम करून होणारा लाभ अव्हेरतो, लाच घेण्यापासून आपला हात आवरतो, घातपाताच्या मनसुब्याला आपले कान बंद करतो, दुष्कर्माला आपले डोळे मिटतो,


कारण तुमचे अपराध किती आहेत व तुमची पातके किती घोर आहेत हे मला ठाऊक आहे; तुम्ही नीतिमानाला जाचता, तुम्ही लाच घेता व वेशीत दरिद्र्यांचा न्याय बुडवता.


दुष्कर्म जोमाने करावे म्हणून ते आपले दोन्ही हात चालवतात; सरदार फर्मावतो ते न्यायाधीश लाच घेऊन करतो; वेडा मनुष्य आपल्या मनातील दुष्ट भाव बोलून दाखवतो; असे ते सर्व मिळून दुष्टतेचे जाळे विणतात.


मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणारपिणार नाही.”


विपरीत न्याय करू नये, पक्षपात करू नये आणि लाच घेऊ नये, कारण लाच शहाण्यांचे डोळे आंधळे करते आणि नीतिमानाच्या दाव्यांचा विपर्यास करते.


पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाहीत; त्यांना पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्यायनिवाडा विपरीत करीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan