Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 26:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे परमेश्वरा, माझा न्याय कर, कारण मी सात्त्विकपणे वागलो आहे, आणि परमेश्वरावर भरवसा ठेवला आहे; मी घसरणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे परमेश्वरा, माझा न्याय कर. कारण मी प्रामाणिकपणाने चाललो आहे. मी परमेश्वरावर न डगमगता विश्वास ठेवला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेह, माझा न्याय करून मला निर्दोष जाहीर करा, मी दोषरहित जीवन जगलो; याहवेह, मी न डगमगता तुमच्यावर विश्वास ठेवला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 26:1
30 Iomraidhean Croise  

“हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्त्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करत आलो आहे ह्याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो.” असे म्हणून हिज्कीया मनस्वी रडला.


परमेश्वराने सैतानाला विचारले, “माझा सेवक ईयोब ह्याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्त्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही; त्याचा विनाकारण नाश करण्यास तू मला चिथवलेस, तरी तो आपल्या सत्त्वाला दृढ धरून राहिला आहे.”


तुझ्या देवभक्तीचा तुला आश्रय आहे ना? तुझ्या सात्त्विक आचरणावर तुझी आशा आहे ना?


तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही; तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही.


जो सात्त्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो,


कारण परमेश्वरावर राजाची श्रद्धा आहे, परात्पराच्या कृपेने तो ढळणार नाही.


हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे; माझी फजिती होऊ देऊ नकोस; माझ्या वैर्‍यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस;


सात्त्विकपण व सरळपण माझे संरक्षण करोत, कारण मी तुझी प्रतीक्षा करीत आहे.


मी तर सात्त्विकपणे वागेन; माझा उद्धार कर, माझ्यावर दया कर.


परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे; त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेवला आणि मी साहाय्य पावलो; म्हणून माझे हृदय उल्लासते; मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन.


हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे; मी म्हणतो, “तूच माझा देव आहेस.”


हे परमेश्वरा, माझ्या देवा, आपल्या नीतीने माझा न्यायनिवाडा कर; ते माझ्याविरुद्ध हर्ष न करोत.


त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते; त्याचे पाय घसरणार नाहीत.


नीतिमत्त्वपूर्वक यज्ञ करा; परमेश्वरावर भाव ठेवा;


हे देवा, माझा न्याय कर; भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ; कपटी व कुटिल मनुष्यापासून मला मुक्त कर.


हे देवा, तू आपल्या नावाने मला तार; आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर;


तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे; तोच माझा उंच गड आहे; मी सहसा ढळणार नाही.


तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे; मी ढळणार नाही.


परमेश्वर लोकांचा न्याय करतो; माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे व माझ्या ठायी असलेल्या सात्त्विकतेप्रमाणे, हे परमेश्वरा, माझा न्याय कर.


“माझा पाय घसरला,” असे मी म्हणालो, तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या दयेने मला आधार दिला.


जो नीतिमान मनुष्य सात्त्विकपणे चालतो, त्याच्यामागे त्याची मुले धन्य होतात.


मनुष्याची भीती पाशरूप होते; पण जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते.


आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषेकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्त्विकपणाने वागलो.


आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू; कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे;


म्हणून बंधूंनो, तुम्हांला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही;


तो आपल्या भक्तांची पावले सांभाळील. पण दुष्ट अंधारात स्तब्ध पडून राहतील; कारण कोणीही मानव आपल्याच बलाने विजयी होणार नाही.


परमेश्वर न्यायाधीश आहे, तो माझ्या व तुमच्यामध्ये निवाडा करो; माझे प्रकरण लक्षात आणून तो माझा कैवार घेवो, व माझा न्याय करून मला आपल्या हातून सोडवो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan