Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 24:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा; पुरातन द्वारांनो, उंच व्हा; म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 अहो! वेशींनो, आपले मस्तक उंच करा. पुर्वकालीन द्वारांनो, उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 अहो वेशींनो, आपले मस्तक उंच करा; प्राचीन द्वारांनो, उच्च व्हा; गौरवाच्या राजाला आत प्रवेश करू द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 24:7
23 Iomraidhean Croise  

लोक परमेश्वराचा कोश नगरात घेऊन आले व त्याच्या स्थानी म्हणजे जो तंबू दाविदाने त्याच्यासाठी उभा केला होता त्यात त्यांनी तो ठेवला; तेव्हा दाविदाने परमेश्वराला होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली.


त्या मेघामुळे याजकांना सेवाचाकरी करण्यास उभे राहवेना, कारण परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरून गेले.


मग याजकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश मंदिराच्या गाभार्‍यात, परमपवित्रस्थानात करूबांच्या पंखांखाली त्याच्या ठिकाणी नेऊन ठेवला.


हे परमेश्वरा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये.


हे परमेश्वरा तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो; तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्लास होतो!


तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचा मोठा गौरव होतो; तू त्याला प्रताप व महिमा ह्यांनी भूषित करतोस.


आकाशाने त्याची नीती प्रकट केली; सर्व लोकांनी त्याचा गौरव पाहिला.


वेशी उघडा म्हणजे सत्याचे पालन करणारे नीतिमान राष्ट्र आत येईल.


बाहेर पडा, वेशीतून बाहेर पडा; लोकांचा मार्ग नीट करा; राजमार्गाला भर घाला, घाला भर; धोंडे काढून टाका; अन्य राष्ट्रांसाठी ध्वजा उभारा.


हे कळपाच्या दुर्गा,1 सीयोनकन्येच्या डोंगरा, तुझे पूर्वीचे राज्य तुला परत येईल, यरुशलेमेच्या कन्येला राज्य पुन्हा प्राप्त होईल.


मी सर्व राष्ट्रांना हलवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तू येतील;1 आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


ह्या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी ह्या स्थळाला शांती देईन,”’ असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो; ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पाहा, करार घेऊन येणार्‍या निरोप्याची3 तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला.


ते ह्या युगातल्या अधिकार्‍यांतील कोणालाहळले नव्हते; कारण त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते;


माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका.


तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता ‘देवाच्या उजवीकडे’ आहे, त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत.


आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात2 वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन.


“हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस; कारण तू सर्वकाही निर्माण केलेस, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan