Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 24:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही परमेश्वराचे आहे; जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे. जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 24:1
18 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच; आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच; हे परमेश्वरा; राज्यही तुझेच; तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्नत आहेस.


हे परमेश्वरा, आमच्या देवा, हा जो मोठा निधी आम्ही तुझ्या पवित्र नामाचे मंदिर बांधण्यासाठी जमवला आहे हा तुझ्याच हातून आम्हांला मिळाला आहे; हा सर्व तुझाच आहे.


अमस्याने देवाच्या माणसाला विचारले, “मी शंभर किक्कार रुपे इस्राएलच्या सैन्यास देऊन चुकलो आहे त्याच्यासंबंधाने मी काय करू?” देवाच्या माणसाने उत्तर दिले, “तुला ह्याहूनही अधिक देण्याची परमेश्वरास ताकद आहे.”


ही पृथ्वी त्याच्या स्वाधीन कोणी केली आहे? ह्या सर्व जगाची व्यवस्था कोणी लावली?


मला कोणी प्रथम काही दिले आहे काय की मी त्याची फेड करू? अखिल नभोमंडळाखाली जे काही आहे ते माझे आहे.


तो तुझे आर्जव करीत राहील काय? तो तुला लाडीगोडी लावील काय?


कारण वनातील सर्व पशू, हजारो डोंगरांवरील गुरेढोरे माझी आहेत.


मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही, कारण जग व जगातले सर्वकाही माझे आहे.


आकाश तुझे आहे, पृथ्वीही तुझी आहे; जग व त्यातले सर्वकाही तूच स्थापले आहेस.


उत्तर व दक्षिण ह्या तू उत्पन्न केल्यास; ताबोर व हर्मोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात.


समुद्र व त्यातील सर्वकाही, जग व त्यात राहणारे हर्षनाद करोत.


म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे;


मोशे त्याला म्हणाला, “मी नगराबाहेर गेलो की परमेश्वराकडे आपले हात पसरीन तेव्हा मेघगर्जना बंद होईल व गारा पडायच्या नाहीत; ह्यावरून तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.


आपणाला मनुष्यांतून घालवून देतील; आपली वस्ती वनपशूंत होईल; आपणाला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल; आपण आकाशातील दहिवराने भिजाल; मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो हे ज्ञान आपणाला होईपर्यंत आपणावरून सात काळ जातील.


सीयोनकन्ये, ऊठ, मळणी कर; मी तुझे शिंग लोखंडासारखे व तुझे खूर पितळेसारखे करतो; तू अनेक राष्ट्रांचा चुराडा करशील, त्यांची कमाई परमेश्वराला वाहशील, त्यांची संपत्ती सकल पृथ्वीच्या प्रभूला तू वाहशील.


त्याच्यापुढे पर्वत कंपायमान होतात व डोंगर विरघळतात; त्याच्यापुढे ही पृथ्वी, हा भूगोल व त्यांवरील सर्व रहिवासी थडथड उडतात.


कारण “पृथ्वी व तिच्यावर जे काही भरले आहे ते परमेश्वराचे आहे.”


पाहा, आकाश व आकाशापलीकडचे आकाश आणि पृथ्वी व तिच्यातले सर्वकाही तुझा देव परमेश्वर ह्याचे आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan