Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 23:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तो माझा जीव ताजातवाना करतो; तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तो माझा जीव ताजा-तवाना करतो, तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 ते माझा जीव ताजातवाना करतात. ते आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 23:3
28 Iomraidhean Croise  

असा तो त्याचा जीव गर्तेपासून वाचवतो, म्हणजे तो जीवनप्रकाशाने प्रकाशित होतो.


तरी आपला पराक्रम विदित करावा म्हणून, त्याने आपल्या नावासाठी त्यांचे तारण केले.


हे परमेश्वरा, हे प्रभू, तू आपल्या नावासाठी मला वागवून घे; तुझी दया उत्तम आहे म्हणून तू मला सोडव.


हरवलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे; तू आपल्या दासाचा शोध कर; कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही.


परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो.


कारण माझा दुर्ग व माझा गड तूच आहेस; तू आपल्या नावासाठी मला हाती धरून चालव.


त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पसरलेल्या जाळ्यातून तू मला ओढून काढ, कारण तू माझा आश्रय आहेस.


तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा; आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या.


हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या नीतिमार्गाने ने, आपला मार्ग माझ्यापुढे नीट कर.


हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.


तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे; आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर;


हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या महिम्यासाठी आम्हांला साहाय्य कर; आपल्या नावासाठी आम्हांला सोडव व आमची पातके धुऊन टाक.


त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल व त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील.


मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकवला आहे, तुला सरळतेच्या वाटांनी चालवले आहे.


मी नीतिमार्गाने, न्यायाच्या वाटांनी चालते;


माहीत नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यांना नेईन; अज्ञात अशा मार्गांनी मी त्यांना चालवीन; त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे करीन. ह्या गोष्टी मी करणार, सोडणार नाही.


कारण श्रांत जिवास मी तृप्त केले आहे, प्रत्येक म्लान हृदयास पुन्हा भरून काढले आहे.”


पाहा, मी त्यांना उत्तरेच्या देशांतून आणीन, त्यांना पृथ्वीच्या दिगंताहून जमा करीन; त्यांच्यामध्ये आंधळे व पांगळे, गर्भवती व प्रसूतिवेदना लागलेल्या असतील; मोठ्या समुदायाने ते इकडे परत येतील.


तथापि ज्या राष्ट्रांसमक्ष मी त्यांना बाहेर आणले त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा म्हणून माझ्या नामासाठी मी अशी कृती केली.


त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे.


‘जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो;’ म्हणून आस्था बाळग आणि पश्‍चात्ताप कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan