Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 22:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात, वाकुल्या दाखवतात, थट्टेने डोके डोलवतात;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मला पाहून ते माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, आपले डोके हालवीत,

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 22:7
22 Iomraidhean Croise  

मी देवाचा धावा करी व तो माझे ऐके, त्यामुळे मला माझ्या शेजार्‍यापाजार्‍यांनी हसावे ना! नीतिमान व सात्त्विक मनुष्याला हसावे ना!


लोक माझ्याकडे पाहून तोंडे विचकत आहेत; माझी निर्भर्त्सना करून ते माझ्या गालावर चापट्या मारत आहेत; ते एकत्र होऊन माझ्यावर चालून आले आहेत.


तुमच्यासारखे मलाही बोलता येईल; तुम्ही माझ्या ठिकाणी असता तर मलाही तुमच्यावर वाग्जाल पसरता आले असते, तुमच्याकडे पाहून मला आपले डोके हलवता आले असते;


मी लोकांना निंदेचा विषय झालो आहे; मला पाहून ते माना हलवतात.


नीतिमानाविरुद्ध गर्वाने, तिरस्काराने व उद्दामपणाने बोलणार्‍यांची वाचा बंद पडो.


राष्ट्रांनी आमच्यावर म्हणी रचाव्या असे तू आम्हांला केले आहेस. व आम्हांला पाहून लोकांनी डोके हलवावे असे तू केलेस.


ज्याला माणसे तुच्छ लेखतात, ज्याला लोक अमंगल मानतात, जो अधिपतींचा दास आहे, त्याला इस्राएलाचा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू जो परमेश्वर, तो म्हणतो, “राजे तुला पाहून उठून उभे राहतील, अधिपती तुला नमन करतील. परमेश्वर जो सत्यवचनी आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे, त्याने तुला निवडून घेतले आहे म्हणून असे होईल.”


तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत; आणि त्याला आम्ही मानले नाही.


कोणाची तुम्ही चेष्टा करता? कोणाला तोंड विचकता? कोणाला जीभ काढून दाखवता? तुम्ही अधर्माची संतती, लबाडीचे बीज नाही काय?


काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेत दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून, ‘हे यहूद्यांच्या राजा, नमस्कार!’ असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली.


“वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्याला हसू लागले.


अशी त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावरून जांभळे वस्त्र काढून त्याचे स्वतःचे कपडे त्याला पुन्हा घातले, आणि वधस्तंभावर खिळण्याकरता ते त्याला बाहेर घेऊन गेले.


मग जवळून जाणार्‍यायेणार्‍यांनी ‘डोकी डोलवत’ त्याची अशी निंदा केली की, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणार्‍या,


धनलोभी परूशी हे सर्व ऐकत होते व त्याला हसत होते.


आणि हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि झगझगीत वस्त्रे त्याच्या अंगावर घालून त्याला पिलाताकडे परत पाठवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan