Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 22:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 माझ्यापासून दूर राहू नकोस, कारण संकट येऊन ठेपले आहे; आणि साहाय्य करणारा कोणी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 माझ्यापासून दूर नको राहू, कारण संकट जवळच आहे. आणि मला मदत करायला कोणीही नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 माझ्यापासून दूर राहू नका, कारण संकट जवळ आहे आणि मला साहाय्य करणारा कोणी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 22:11
18 Iomraidhean Croise  

इस्राएलास दुःसह क्लेश होत आहेत असे परमेश्वराने पाहिले; बंदिवासात किंवा मोकळा असा कोणीही उरला नव्हता; इस्राएलाचा साहाय्यकारी असा कोणीच राहिला नव्हता.


हे परमेश्वरा, तू दूर का उभा राहतोस? संकटसमयी दृष्टिआड का होतोस?


हे परमेश्वरा, तूही पाहिले आहेस, उगा राहू नकोस; हे प्रभू, माझ्यापासून दूर राहू नकोस.


हे परमेश्वरा, मला सोडू नकोस; माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.


माझ्या जिवाजवळ येऊन त्याचा उद्धार कर; माझे वैरी पाहून माझा उद्धार कर.


हे देवा, माझ्यापासून दूर असू नकोस; हे माझ्या देवा, माझ्या साहाय्यासाठी त्वरा कर.


जन्मापासून तूच माझा आधार आहेस; मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस; मी तुझी स्तुती निरंतर करीन.


कारण धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्यांना तो सोडवील.


मी पाहिले पण कोणी साहाय्यकर्ता नव्हता; कोणाची अनुकूलता नव्हती म्हणून मी विस्मित झालो; तेव्हा माझ्याच बाहूने मला साहाय्य केले व माझ्या संतापाने मला आधार दिला.


पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावेत म्हणून हे सर्व झाले आहे.” तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.


पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.”


तेव्हा तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” इतक्यात कोंबडा आरवला.


पाहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे, की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल; तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे.


आपल्या लोकांचा आश्रय तुटला आहे, बद्ध किंवा मुक्त असा कोणी उरला नाही, हे परमेश्वर पाहील तेव्हा तो त्यांचा न्याय करील, त्याला आपल्या सेवकाचा कळवळा येईल.


आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली;


Lean sinn:

Sanasan


Sanasan