Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 22:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? मला तारायला आणि माझ्या वेदनांचा शब्द ऐकायला तू दूर का आहेस?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला? मला वाचविण्यास तुम्ही एवढे दूर का राहिले, माझ्या विव्हळण्याची आरोळी तुम्हापासून दूर का?

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 22:1
23 Iomraidhean Croise  

मला तर अन्नाऐवजी उसासे प्राप्त होत आहेत, माझा आक्रोश जलधारांप्रमाणे वाहत आहे.


हे परमेश्वरा, तू दूर का उभा राहतोस? संकटसमयी दृष्टिआड का होतोस?


हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे.


माझ्यापासून दूर राहू नकोस, कारण संकट येऊन ठेपले आहे; आणि साहाय्य करणारा कोणी नाही.


कुत्र्यांनी मला वेढले आहे; दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे; त्यांनी माझे हातपाय विंधले आहेत.


पातक्यांबरोबर माझा जीव आणि पातकी मनुष्यांबरोबर माझा प्राण काढून नेऊ नकोस;


कारण परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांना सोडत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते; पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो.


माझे अंग बधिर झाले आहे व फारच ठेचून गेले आहे; मी आपल्या हृदयातील तळमळीमुळे ओरडत आहे.


ते म्हणतात, “देवाने ह्याला सोडले आहे; ह्याच्या पाठीस लागा, ह्याला धरा; कारण ह्याला सोडवणारा कोणी नाही.”


मी आपला न्याय जवळ आणत आहे, आता तो दूर नाही; माझ्याकडून होणार्‍या उद्धारास विलंब लागणार नाही; मी सीयोनेत उद्धार स्थापतो, इस्राएलास माझे गौरव देतो.”


आम्ही सगळे अस्वलांसारखे गुरगुरतो, पारव्यांसारखे घुमत राहतो; आम्ही न्यायाची अपेक्षा करतो तर त्याचा पत्ता नाही; तारणाची आशा धरतो तर ते आमच्यापासून दूर राहते;


त्याचे लहान लहान तुकडे करून त्यांच्यावर तेल ओतावे. हे अन्नार्पण होय.


आणि सुमारे नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एली, एली, लमा सबख्थनी,” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”


नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एलोई, एलोई, लमा सबक्थनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”


मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता.


मग तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्याबरोबर असताना तुम्हांला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यांत माझ्याविषयी जे लिहिले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे.”


तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”


आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली;


परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan