Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 21:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तू प्रकट होशील तेव्हा तू त्यांना जळजळीत भट्टीसारखे पेटवशील; परमेश्वर आपल्या क्रोधाने त्यांना ग्राशील, अग्नी त्यांचा संहार करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तुझ्या क्रोधसमयी तू त्यांना जळत्या भट्टीत जाळून टाकशील. परमेश्वर त्याच्या क्रोधसमयी त्यांचा नाश करणार, आणि त्याचा अग्नी त्यांना खाऊन टाकणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तुम्ही युद्ध करण्यासाठी जेव्हा प्रगट व्हाल, तेव्हा तुम्ही अग्नीच्या भट्टीमध्ये भस्म केल्यागत त्यांना नष्ट कराल. आपल्या क्रोधाने याहवेह त्यांना गिळंकृत करतील, याहवेहचा अग्नी त्यांना भस्म करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 21:9
28 Iomraidhean Croise  

त्याने सदोम व गमोरा आणि अवघा तळवटीचा प्रदेश ह्यांच्याकडे नजर फेकली तर पाहा, त्या प्रदेशातून भट्टीच्या धुरासारखा धूर वर चालला होता!


यरुशलेमेतील देवाच्या ह्या मंदिराचा विध्वंस करावा ह्या उद्देशाने ह्या आज्ञेत जे कोणी खटपटी करतील व जे कोणी राजे किंवा लोक ती फिरवावी म्हणून तीत हात घालतील त्या सर्वांचा निःपात ज्या देवाने तेथे आपल्या नामाचा निवास केला आहे तो करील; मी दारयावेश हा हुकूम करीत आहे त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी.”


ती समुद्राच्या वाळूपेक्षा जड भरेल! म्हणूनच माझे बोलणे मर्यादेबाहेर गेले आहे.


तेव्हा भूमी फाटली व तिने दाथानाला गिळून टाकले, आणि अबिरामाच्या टोळीस गडप केले;


मी त्यांना इतका मार दिला की त्यांना उठता येईना, त्यांना मी पायांखाली तुडवले.


त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता, त्याच्या मुखातून ग्रासणारा अग्नी निघत होता, त्यामुळे निखारे धगधगत होते.


पुत्राने2 रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या; कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल; त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत.


पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यांना घाबरे करील.


आमचा देव येत आहे, तो उगा राहायचा नाही; त्याच्यापुढे अग्नी ग्रासत चालला आहे. त्याच्याभोवती मोठे वादळ सुटले आहे.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


प्रभूने याकोबाची सर्व वसतिस्थाने गिळून टाकली आहेत, गय केली नाही; त्याने आपल्या क्रोधाने यहूदाच्या कन्येचे दुर्ग मोडून टाकले आहेत; त्याने ते धुळीस मिळवले आहेत; त्याने राज्य व त्यातले सरदार ह्यांना भ्रष्ट केले आहे.


त्याच्या रागापुढे कोण टिकणार? त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार? त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो, त्याच्यापुढे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात.


पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील; तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.


आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.”


तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले.


मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.


‘ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील.”’


आणि आताच तर झाडांच्या मुळाशी कुर्‍हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.


त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझत्या अग्नीने जाळून टाकील.”


कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकाच्या तळापर्यंत ती पसरली आहे, पृथ्वी व तिचा उपज ती भस्म करीत आहे, व डोंगरांचे पायथे जाळून टाकीत आहे.


परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलतो, ते बोलण्याची ते मनाई करतात; हे ह्यासाठी की, त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरत राहावे. त्यांच्यावरील क्रोधाची परिसीमा झाली आहे.


तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.


त्याने ‘राष्ट्रांना मारावे’ म्हणून त्याच्या ‘तोंडातून तीक्ष्ण धारेची’ तलवार निघते; तो ‘त्यांच्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील’; आणि सर्वसमर्थ देव ह्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे ‘कुंड तो तुडवतो.’


तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय.


Lean sinn:

Sanasan


Sanasan