Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 21:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचा मोठा गौरव होतो; तू त्याला प्रताप व महिमा ह्यांनी भूषित करतोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तुझ्या विजयामुळे त्याचे गौरव थोर आहे. तू त्यास ऐश्वर्य व वैभव बहाल केलेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तुम्ही त्याला विजय आणि बहुमान दिला; तुम्ही त्याला ऐश्वर्य व वैभव दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 21:5
24 Iomraidhean Croise  

हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे; तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बर्‍याच काळाचे सांगून ठेवले आहेस; प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहेस.


तू आपला बाप दावीद ह्याच्याप्रमाणे माझ्या मार्गांनी चालून माझे नियम व माझ्या आज्ञा पाळशील तर मी तुझ्या आयुष्याची वृद्धी करीन.”


तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्यास तू अशी बरकत दिली आहेस की ते तुझ्या दृष्टीसमोर निरंतर कायम राहावे, कारण हे परमेश्वरा, तूच त्याचे अभीष्ट केले आहेस व ते निरंतर धन्य झाले आहे.”


माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, “मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.”


सीयोन डोंगरावर उतरणार्‍या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे.


तरी हे परमेश्वरा, तू माझ्याभोवती कवच आहेस; तू माझा गौरव, माझे डोके वर करणारा आहेस.


तो देवासमोर चिरकाल राहो; तुझे वात्सल्य व सत्य त्याचे रक्षण करतील असे कर;


माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे; माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे;


तू त्याला देवापेक्षा1 किंचित कमी असे केले आहेस; त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहेस.


मान व महिमा त्याच्यासमोर आहेत; सामर्थ्य व सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत;


अदोमाहून येत आहे हा कोण? लालभडक वस्त्रे लेऊन बसराहून येत आहे हा कोण? आपल्या वस्त्राभरणांनी भूषित होऊन, आपल्या पराक्रमाच्या आढ्यतेने डुलत येत आहे हा कोण? “जो नीतीने बोलणारा, जो तारण करण्यास समर्थ तो मी आहे.”


तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.


ह्या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, “हे माझ्या पित्या, वेळ आली आहे; पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या पुत्राचा गौरव कर;


तू जो गौरव मला दिला आहेस तो मी त्यांना दिला आहे, ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे;


तर आता हे माझ्या पित्या, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्याजवळ होता त्याच्या योगे तू आपणाजवळ माझा गौरव कर.


सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की, स्वर्गामध्ये राजवैभवाच्या सिंहासनाच्या ‘उजवीकडे बसलेला’ असा प्रमुख याजक आपल्याला आहे.


तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता ‘देवाच्या उजवीकडे’ आहे, त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan