Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 21:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले; तू त्याला युगानुयुगाचे दीर्घ आयुष्य दिलेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू त्यास न संपणारे आयुष्य दिलेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्याने तुमच्याजवळ जीवनाची मागणी केली— तुम्ही त्याला युगानुयुगाचे आयुष्य दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 21:4
15 Iomraidhean Croise  

त्यांचा रक्तपात यवाबाच्या शिरी व त्याच्या संततीच्या शिरी उलटून सदोदित राहील. तथापि दावीद, त्याचा वंश, त्याचे घराणे व त्याची गादी ह्यांना परमेश्वराकडून सर्वकाळ शांती प्राप्त होईल.”


शलमोन राजा समृद्ध होईल व दाविदाचे राज्य परमेश्वरासमोर निरंतर कायम राहील.”


मग त्याने राजकुमाराला बाहेर आणले, त्याच्या शिरावर मुकुट ठेवून त्याच्या हातात आज्ञापट दिला; मग त्यांनी त्याला अभिषेक करून राजा केले व टाळ्यांचा गजर करून म्हटले, “राजा चिरायू होवो.”


माझा जीव वाचो, म्हणजे तो तुझी स्तुती करील; तुझे निर्णय मला साहाय्य करोत.


माझ्यावर करुणा कर म्हणजे मी जगेन; कारण तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे.


हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे पाहा, मला उत्तर दे; मला मृत्युनिद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे प्रकाशित कर;


सीयोन डोंगरावर उतरणार्‍या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे.


त्याचे नाव सर्वकाळ राहो; सूर्य आहे तोवर त्याचे नाव वृद्धिंगत होवो; त्याच्या नावाने लोक आपणांस धन्य म्हणोत; सर्व राष्ट्रे त्याचा धन्यवाद करोत.


त्याची संतती सर्वकाळ राहील, व त्याचे राजासन स्वर्गाच्या दिवसांप्रमाणे अक्षय राहील असे करीन.


त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन; त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन.


तोच परमेश्वराचे मंदिर बांधील; तो वैभवशाली होईल; तो आपल्या सिंहासनावर बसून सत्ता चालवील; तो आपल्या सिंहासनावर याजकही होईल; ह्या दोहोंत शांततेची सल्लामसलत होईल.”’


मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan