Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 21:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कल्याणदायी वरदाने घेऊन तू त्याला सामोरा येतोस. तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालतोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण तो तुजकडे मोठे आशीर्वाद आणतो. तू त्याच्या डोक्यावर शुद्ध सोन्याचा मुकुट चढवतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 उत्कृष्ट आशीर्वादाने तुम्ही त्याचे स्वागत केले; तुम्ही त्याच्या मस्तकावर शुद्ध सोन्याचा राजमुकुट घातला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 21:3
16 Iomraidhean Croise  

त्याने त्या लोकांच्या राजाच्या1 मस्तकावरून मुकुट काढला; त्याचे वजन सोन्याचा एक किक्कार2 असून तो रत्नखचित होता, तो दाविदाच्या मस्तकावर ठेवला. त्याने त्या नगरातून पुष्कळ लूट आणली.


यहूदी लोकांनी तेथे जाऊन दाविदाला अभिषेक करून यहूदाच्या वंशाचा राजा नेमले. दाविदाला त्यांनी सांगितले की, “शौलाला ज्यांनी मूठमाती दिली ते याबेश-गिलादाचे लोक होते.”


ह्या प्रकारे इस्राएलांचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला, आणि त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलांवर राजा नेमले.


दाविदाने त्या लोकांच्या राजाच्या2 मस्तकांवरून मुकुट काढला; त्याचे वजन एक सोन्याचा किक्कार आहे असे त्याला कळून आले; तो रत्नजडित होता; तो दाविदाच्या मस्तकावर ठेवण्यात आला. त्याने त्या नगरातून पुष्कळ लूट आणली.


हे परमेश्वरा, देवा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये; हे परमेश्वरा, देवा, तुझे याजक उद्धाराने भूषित होवोत आणि तुझे भक्त सुजनतेत आनंद पावोत.


मला कोणी प्रथम काही दिले आहे काय की मी त्याची फेड करू? अखिल नभोमंडळाखाली जे काही आहे ते माझे आहे.


माझ्या विपत्काली ते माझ्यावर चालून आले तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला.


तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू; आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू; तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करो.


तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणार्‍यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय करणार्‍यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस.


माझा प्रेमळ देव मला भेटेल; देव माझ्या शत्रूंच्या बाबतीत माझे डोळे निववील.


“अथवा त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे?”


किंवा देवाची ममता तुला पश्‍चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे;


देवाच्या कृपेने प्रत्येकाकरता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला ‘देवदूतांपेक्षा काही काळापुरते कमी केले होते,’ तो येशू मरण सोसल्यामुळे ‘गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केलेला’ असा आपण पाहतो.


‘त्याचे डोळे अग्नीच्या’ ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते; त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे; ते त्याच्यावाचून कुणालाही कळत नाही.


मग शमुवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला; आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला. नंतर शमुवेल उठून रामास गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan