Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 20:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तो तुझ्या सर्व अन्नार्पणांचे स्मरण ठेवो, तुझे होमार्पण त्याला मान्य होवो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो, आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तू दिलेल्या सर्व अर्पणांचे त्यांना स्मरण होवो आणि तुझी होमार्पणे ते स्वीकारोत. सेला

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 20:3
11 Iomraidhean Croise  

हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून म्हणजे त्यांच्यातल्या पुष्ट मेंढरांतून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण ह्यांचा आदर केला;


दाविदाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधून होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली आणि परमेश्वराचा धावा केला, परमेश्वराने त्या होमबलीच्या वेदीवर दिव्याग्नी पाडून त्याला उत्तर दिले.


शलमोनाने प्रार्थना करणे संपवल्यावर स्वर्गातून अग्नीने येऊन होमबली व यज्ञबली भस्म केले; आणि परमेश्वराच्या तेजाने ते मंदिर भरून गेले.


परमेश्वर सीयोनेतून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो.


आकाश व पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता परमेश्वर सीयोनेतून तुला आशीर्वाद देवो.


म्हणजे नीतिमत्त्वपूर्वक केलेले यज्ञ, होमबली, निःशेष होमबली तुला आवडतील; मग ते तुझ्या वेदीवर गोर्‍हे अर्पण करतील.


केदारचे सर्व कळप तुझ्याजवळ एकत्र होत आहेत; नबायोथचे एडके तुझ्या कामी येतील; ते मला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील, आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवीन.


आणि परमेश्वराच्या समोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी ही भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.


तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, “काय महाराज?” त्याने त्याला म्हटले, “तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत.


आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वत:ला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.


तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात; ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan