Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 20:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको; याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो, याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 संकटाच्या समयी याहवेह तुझे ऐको; याकोबाच्या परमेश्वराचे नाम सर्व अरिष्टांपासून तुझे रक्षण करो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 20:1
21 Iomraidhean Croise  

तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाला.


मी संकटांतून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस; माझ्या वैर्‍यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवतोस, आणि तुझा उजवा हात माझा बचाव करतो.


परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करतो; तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरूज आहे.


जो दीनांची चिंता वाहतो तो धन्य! संकटसमयी परमेश्वर त्याला मुक्त करील.


देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.


सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. (सेला)


सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. (सेला)


“ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे, त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा.”


शत्रूपासून तू आमची सुटका कर, कारण मनुष्याचे साहाय्य केवळ व्यर्थ आहे.


म्हणजे तू, केवळ तूच, परमेश्वर3 ह्या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळू दे.


ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण, हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाहीस.


परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यात नीतिमान धावत जाऊन निर्भय राहतो.


परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सेवकाचे ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण आहे? जो अंधारात चालतो, ज्याला प्रकाश मिळत नाही त्याने परमेश्वराच्या नामावर भाव ठेवावा, आपल्या देवाचा आश्रय करावा.


हायहाय! तो महादिन आहे; त्याच्यासमान दुसरा कोणता नाही; तो याकोबाचा क्लेशसमय आहे तरी त्यातून त्याचा निभाव होईल.


आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली;


Lean sinn:

Sanasan


Sanasan