Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 19:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते जीवाला पुर्नजीवित करणारे आहे. परमेश्वराचे नियम विश्वसनीय आहेत, ज्यांना अनुभव नाही त्यांना शहाणपण देणारे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 याहवेहचे नियम उत्कृष्ट आहेत; ते आत्म्याला ताजेतवाने करतात. याहवेहचे नियम विश्वसनीय आहेत, ते भोळ्यांना सुज्ञ करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 19:7
41 Iomraidhean Croise  

माझ्या घराण्याचा देवाशी असा संबंध नाही काय? कारण त्याने माझ्याशी निरंतरचा करार केला आहे; तो सर्व प्रकारे यथास्थित व निश्‍चित आहे; माझा संपूर्ण उद्धार व अभीष्ट ह्यांचा तो उदय होऊ देणार नाही काय?


त्याच्या तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली नाही; माझ्या स्वतःच्या मनोरथापलीकडे2 मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली आहेत.


त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य व न्याय आहेत; त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत.


तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.


तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो.


तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते.


तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा, असे मानून मी अत्यानंद करतो.


तुझ्या निर्बंधांवरून मला पूर्वीपासून ठाऊक आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापले आहेत.


तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत. ते माझे मंत्री आहेत.


सोन्यारुप्याच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे.


तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने.


देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग परिपूर्ण आहे; परमेश्वराचे वचन कसास उतरले आहे; त्यांचा आश्रय करणार्‍या सर्वांची तो ढाल आहे.


तो माझा जीव ताजातवाना करतो; तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो.


तुझे निर्बंध अभंग आहेत; हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते.


भोळ्यांना चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे;


माझ्या शिष्यांच्या ठायी ही साक्ष पक्की कर, हे नियमशास्त्र मुद्रित कर.”


नियमशास्त्र व साक्ष ह्यांकडे पाहा! ह्याप्रमाणे ते न बोलल्यास त्यांच्यासाठी निश्‍चये प्रभातसमय नाही.


तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता;1 कारण त्यांच्या द्वारे तुम्हांला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हांला वाटते; आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत;


त्याच्यावर विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात.”


देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.


धीराच्या व शास्त्रापासून मिळणार्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले.


सर्व बाबतींत पुष्कळच आहे. प्रथम हे की, देवाची वचने त्यांना सोपवून दिली होती.


तो दुर्ग आहे; त्याची कृती परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे, त्याच्या ठायी अनीती नाही; तो न्यायी व सरळ आहे.


ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो; परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा;


म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नयेस; तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दु:ख सोसावे.


तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे : “प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.”


प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.


नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश:प्राप्ती घडेल.


तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमन करणार होतो; परंतु तो मला म्हणाला, “असे करू नये; मी तुझ्या सोबतीचा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर;” कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म1 आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan