Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 18:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली; त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मी संकटात असता, मी परमेश्वरास हाक मारली; मी देवाला माझ्या मदतीसाठी हाक मारली. त्याने त्याच्या पवित्र मंदिरातून माझी वाणी ऐकली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मी आपल्या संकटात याहवेहचा धावा केला; परमेश्वराकडे मदतीसाठी मी हाक मारली. त्यांनी आपल्या मंदिरातून माझी आरोळी ऐकली; माझा धावा त्यांच्या कानांपर्यंत पोहोचला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 18:6
17 Iomraidhean Croise  

मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली; त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली.


मग लेवीय याजकांनी उभे राहून लोकांना आशीर्वाद दिले; त्यांची वाणी देवाने ऐकली, आणि त्यांची प्रार्थना देवाच्या पवित्र निवासापर्यंत, स्वर्गापर्यंत जाऊन पोहचली.


परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे; परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे; त्याचे नेत्र मानवांना पाहतात, त्याच्या पापण्या त्यांना अजमावतात.


मी संकटात असता परमेश्वराचा धावा केला, आणि त्याने माझे ऐकले.


परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.


मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईन; तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन.


आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


भीती व कापरे ही माझ्यावर येऊन गुदरली आहेत; धडकीने मला व्यापले आहे.


बराच काळ लोटल्यावर मिसराचा राजा मृत्यू पावला; इकडे इस्राएलवंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत, आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहचली.


परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे; सर्व धरित्री त्याच्यापुढे स्तब्ध राहो.


आणि तो म्हणत होता, “अब्बा, बापा, तुला सर्वकाही शक्य आहे; हा प्याला माझ्यापासून दूर कर; तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”


ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहार्‍यात होता; परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती.


तेव्हा देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले, ‘त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश’ दृष्टीस पडला आणि ‘विजा’ चमकल्या, ‘गर्जना’ व मेघांचे गडगडाट झाले, भूमिकंप झाला व ‘मोठ्या गारांची वृष्टीही’ झाली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan