Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 18:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जो स्तुतीच्या योग्य आहे, त्या परमेश्वरास मी हाक मारीन, आणि मी माझ्या शत्रूंपासून वाचवला जाईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 स्तुतीस योग्य याहवेहचा मी धावा केला, आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 18:3
26 Iomraidhean Croise  

स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो.


मग येशूवा, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या व पथह्या हे लेवी म्हणाले, “उभे राहा आणि आपला देव परमेश्वर ह्याचा येणेप्रमाणे धन्यवाद अनंतकाळ करा : तुझे वैभवशाली नाम धन्य असो; ते सर्व धन्यवाद व स्तवन ह्यांपलीकडे आहे.


परमेश्वर जो माझा दुर्ग त्याचा धन्यवाद होवो; तो माझ्या हातांना लढायला शिकवतो; माझ्या बोटांना युद्ध करायला शिकवतो.


परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; त्याची थोरवी अगम्य आहे.


मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो, आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो. (सेला)


त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पसरलेल्या जाळ्यातून तू मला ओढून काढ, कारण तू माझा आश्रय आहेस.


परमेश्वर थोर आहे, आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र डोंगरावर, तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे.


आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


मी तर देवाचा धावा करीन, आणि परमेश्वर मला तारील.


एकट्या मनुष्याला मारण्यासाठी त्याच्यावर तुम्ही सर्व कोठवर चढाई करून याल? तो झुकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे.


अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा; त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा; देव आमचा आश्रय आहे. (सेला)


मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा खडक हो; माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस. कारण तू तर माझा गड व माझा दुर्ग आहेस.


तू प्रतापी आहेस, लुटीने भरलेल्या पर्वतावर तेजस्वी आहेस.


तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन;


परमेश्वराला मी “माझा आश्रय, माझा दुर्ग” असे म्हणतो; “तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो.”


कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व देवांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे.


हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, माझ्या दुर्गा, संकटसमयीच्या माझ्या आश्रया, पृथ्वीच्या दिगंतापासून राष्ट्रे तुझ्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांना खोट्या, निरर्थक व निरुपयोगी अशा वस्तूंचाच काय तो वतनभाग मिळाला.


म्हणजे आपल्या ‘शत्रूंच्या’ व आपला ‘द्वेष करणार्‍या’ सर्वांच्या ‘हातून’ सुटका करावी;


तेव्हा असे होईल की, जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.’


“हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस; कारण तू सर्वकाही निर्माण केलेस, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan