Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 16:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे; तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मी परमेश्वरास नेहमी माझ्यासमोर ठेवतो म्हणून मी त्याच्या उजव्या हातातून कधीही ढळणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मी आपली दृष्टी सतत याहवेहवर ठेवली आहे; ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 16:8
13 Iomraidhean Croise  

कारण दरिद्र्याचा जीव दोषी ठरवणारे जे आहेत त्यांच्यापासून त्याचा बचाव करण्यासाठी तो त्याच्या उजव्या हाताकडे उभा असतो.


तुझ्या उजव्या हाताकडे असलेला प्रभू आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा बिमोड करील;


परमेश्वर तुझा रक्षक आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे.


ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील; मला जाग येते तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो.


आपला पैसा वाढीदिढीला लावत नाही, निरपराध्यांची हानी करण्याकरता लाच घेत नाही, तो; जो असा वागतो तो कधी ढळणार नाही.


तुझे सर्व वैरी तुझ्या हाती लागतील; तुझे सर्व द्वेष्टे तुझ्या उजव्या हातात पडतील.


एकट्या मनुष्याला मारण्यासाठी त्याच्यावर तुम्ही सर्व कोठवर चढाई करून याल? तो झुकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे.


तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे; मी ढळणार नाही.


माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे; माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे;


तरी मी नेहमी तुझ्याजवळ आहे; तू माझा उजवा हात धरला आहेस.


माझा देह व माझे हृदय ही खचली; तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे.


त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan