Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 16:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस; तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 कारण तू माझ्या जीवाला मृतलोकांत राहू देणार नाही, ज्याच्याजवळ तुझी प्रेमदया आहे, त्यास तू अधोलोक पाहू देणार नाहीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही; किंवा तुमच्या विश्वासणार्‍याला तुम्ही कुजणे पाहू देणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 16:10
23 Iomraidhean Croise  

ते गगनाइतके उंच आहे, तेथे तुझे काय चालणार? ते अधोलोकाहून खोल आहे, तुला ते काय कळणार?


मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस; अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पाहा, तेथे तू आहेस.


परंतु देव माझा जीव अधोलोकाच्या कबजातून सोडवील; कारण तो मला आपणाजवळ घेईल. (सेला)


देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील.


अधोलोक आणि विनाशस्थान1 ही परमेश्वराच्या दृष्टीपुढे आहेत; तर मग मनुष्यजातीची अंत:करणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत!


अधोलोक व विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाहीत; आणि मनुष्याचे नेत्रही कधी तृप्त होत नाहीत.


खाली अधोलोकात तुझ्या स्वागतार्थ गडबड उडाली आहे; तो तुझ्यासाठी पृथ्वीवरील मरून गेलेल्या सर्व प्रमुखांना जागृत करीत आहे; राष्ट्रांच्या सर्व राजांना त्यांच्या-त्यांच्या सिंहासनावरून उठवत आहे.


ह्यामुळे अधोलोकाने आपली क्षुधा वाढवली आहे, आपले तोंड अमर्याद पसरले आहे; त्यात त्यांचे वैभव, त्यांचे जमाव, त्यांचा थाटमाट, तेथले मौज मारणारे पडतील.


आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्‍चित्त करावे, सनातन नीतिमत्ता उदयास आणावी, दृष्टान्त व संदेश मुद्रित करावेत आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर ह्यासंबंधाने सत्तर सप्तके ठरली आहेत.


कोणी मृत झाल्यामुळे आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा आपले अंग गोंदवून घेऊ नका; मी परमेश्वर आहे.


ते अधोलोक फोडून आत उतरले, तरी माझा हात त्यांना तेथून ओढून काढील; ते वर स्वर्गात चढले, तरी तेथून मी त्यांना खाली ओढून आणीन.


जितके दिवस त्याने परमेश्वराला वाहून घेतले असेल तितके दिवस त्याने प्रेताजवळ जाऊ नये.


देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.


तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले.


“अरे येशू नासरेथकरा! ‘तू आमच्यामध्ये का पडतोस?’ तू आमचा नाश करण्यास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र (पुरुष) तो.”


तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते;


कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकाच्या तळापर्यंत ती पसरली आहे, पृथ्वी व तिचा उपज ती भस्म करीत आहे, व डोंगरांचे पायथे जाळून टाकीत आहे.


मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.


तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत माणसांना बाहेर सोडले; मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतांना बाहेर सोडले; आणि ‘ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे’ प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan